‘गोल्डमन सॅच्स’ चे माजी संचालक रजत गुप्ता यांनी खटल्याच्या खर्चापोटी ६० लाख २० हजार अमेरिकी डॉलर्स भरपाई म्हणून ‘गोल्डमन सॅच्स’ ला द्यावेत, असा आदेश भरावेत, असा आदेश फेडरल न्यायालयाचे न्या. जेड रॅकॉफ यांनी दिला आहे. अमेरिकेतील सर्वात मोठय़ा आर्थिक घोटाळ्यांपैकी एक म्हणून ओळखल्या गेलेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी गुप्ता यांना ही रक्कम भरण्याचा आदेश देण्यात आला. आपल्या कंपनीतील व्यावसायिक स्वरूपाच्या गोपनीय बाबी मित्र राज राजरत्नम् यांच्याकडे उघड करून स्वत:चा आर्थिक फायदा करून घेतल्याप्रकरणी गुप्ता हे दोषी ठरले असून त्यांना गेल्या वर्षी दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षाही ठोठावण्यात आली. गुप्ता हे सध्या जामिनावर आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajat gupta ordered to pay usd 6 2 mln to goldman sachs