पाण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला दिले जाणारे आणि पाण्याचे नोबेल असे संबोधले जाणारे ‘स्टॉकहोम वॉटर प्राइझ’ या वर्षीसाठी नद्यांच्या पुनरुज्जीवनाची चळवळ उभे करणारे आणि जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे राजेंद्रसिंह राणा यांना जाहीर झाले आहे. त्यांना स्वीडनच्या राजाकडून येत्या २६ ऑगस्ट रोजी हे पारितोषक दिले जाणार आहे.
 यापूर्वी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे आणि  बिंदेश्वर पाठक या भारतीयांना हे पारितोषक मिळाले आहे.
‘जोहड’ ची निर्मिती
राजस्थानमध्ये हजारो ‘जोहड’ निर्माण करण्याच्या माध्यमातून राजेंद्रसिंह प्रसिद्धीस आले होते. त्यांनी ‘तरुण भारत संघ’ या संघटनेची स्थापना करून शेकडो गावांमध्ये असे जोहड निर्माण केले.
अलीकडच्या काळात त्यांनी नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे कार्य हाती घेतले आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राच्या अनेक भागांत फिरून लोकांचे संघटन केले आणि नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या चळवळीला बळ दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajendra singh the waterman of india awarded stockholm water prize