काटजू यांचा राज्यसभेत सर्वपक्षीय निषेध

महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काट्जू यांचा बुधवारी राज्यसभेत सर्वपक्षीय सदस्यांनी निषेध केला.

राष्ट्रपिता म. गांधी यांना ब्रिटिशांचे, तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जपानचे हस्तक संबोधणारे माजी सरन्यायाधीश मार्कण्डेय काटजू यांचा राज्यसभेत बुधवारी सर्वच पक्षांच्या सदस्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून निषेध केला. राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांनी याबाबतचा ठराव मांडला.
राज्यसबेत शून्य प्रहराला विरोधी आणि सत्तारूढ पक्षाचे सदस्य एकत्र आले आणि त्यांनी न्या. काटजू यांचा निषेध केला. त्यानंतर आवाजी मतदानाने त्यांच्या निषेधाचा ठराव मंजूर केला.
सभागृहाचे नेते अरुण जेटली यांनी या वक्तव्याचा निषेध केला. अशा प्रकारची मानसिकता असलेल्या व्यक्तींची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती होते हा प्रचलित यंत्रणेतील दोष आहे आणि त्यामुळे आम्ही त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करीत आहोत, असेही जेटली म्हणाले.
महात्मा गांधी ब्रिटिशांचे हस्तक – काटजूंचे आणखी एक वादग्रस्त विधान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rajya sabha condemns markandey katju

Next Story
video : रक्तस्त्राव ‘तिला’ रोखू शकत नाही !
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी