शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या आकासा एअरलाइन्सला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाले आहे. एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड ‘आकासा’ एअर या ब्रँड नावाने काम करेल. जर सर्व प्रक्रिया योग्यवेळी पार पडल्या तर पुढच्या वर्षी एप्रिल २०२२ मध्ये आकासा एअरलाईन्सची स्वस्त दरातील विमान सेवा सुरु करण्यात येईल असे कंपनीने म्हटले आहे. अलीकडेच राकेश झुनझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड त्याच्या आकासा एअर या ब्रँड नावाने उड्डाण करणार आहे.. त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे असतील, ज्यांनी यापूर्वी जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. इंडिगोचे माजी अध्यक्ष आदित्य घोष, राकेश झुनझुनवाला आणि जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे हे आकासाचे सह-संस्थापक असतील.

झुनझुनवालांकडे ४० टक्के भागीदारी

राकेश झुनझुनवाला हे ज्यावेळी बहुतांश विमान कंपन्या तोट्यात आहेत त्या वेळी तो नवीन विमानसेवा सुरू करत आहे. त्यांनी अनेक खासगी विमान कंपन्यांच्या बड्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. याशिवाय ते अनेक मोठ्या तज्ज्ञांचे मतही घेत आहे. आकासा विमान कंपनीने प्रवाशांना नवीन मार्गाने प्रवास करण्याचा दावा केला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की त्यांची विमाने अगदी लहान विमानतळांवरही सहज उतरू शकतील. अलीकडेच ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत झुनझुनवाला यांनी आकासामध्ये ४० टक्के भागभांडवल असल्याचे सांगितले होते. या कंपनीकडे पुढील चार वर्षात १८० आसन क्षमतेची ७० विमाने असतील.

कंपनीचे स्वस्त आणि आरामदायक प्रवासाचे आश्वासन

आकासा एअरलाईनने आपल्या वेबसाईटवर प्रवाशांना स्वस्त आणि आरामदायक प्रवासाचे आश्वासन दिले आहे. “आकासा एअरलाईन्सने भारतीय हवाई क्षेत्राच्या कठीण स्पर्धेदरम्यान प्रवेश केला आहे. आम्ही नवीन शोध घेऊन येत आहोत. प्रवाशांना स्वस्त तिकिटे मिळतील आणि आरामदायी प्रवास होईल,” असे त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakesh jhunjhunwala akasa airlines noc from ministry of civil aviation abn