बलात्कार करणाऱ्याच्या चेहऱ्याला शाई फासून जोडे मारण्याची शिक्षा उत्तर प्रदेशातील एका ग्रामपंचायतीने सुनावली आहे. कायद्याला धाब्यावर बसवून ग्रामपंचायतीने दिलेल्या या आदेशाची चौकशी करण्यात येत असून गुन्हेगारांविरोधात भारतीय दंडसंहितेनुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
येथील तोडलपूर गावामध्ये दोघांनी एका मुलीवर बलात्कार केला होता. त्यांना ग्रामपंचायतीने पाच लाख रुपयांचा दंड सुनावला. एका आरोपीने तो देण्यास नकार दिला. त्यावर ग्रामपंचायतीने संबंधित मुलीला आरोपीच्या चेहऱ्याला शाई फासून जोडे मारण्याचे आदेश दिले. आहेत.
स्थानिक प्रसारमाध्यमांमधून या बातमीचा गवगवा झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. सत्ताधारी समाजवादी पक्षानेही या प्रकरणी ग्रामपंचायतीच्या आदेशाला न जुमानता कायद्यानुसार कारवाई करण्यास पोलिसांना बजावल्याची माहिती दिली. तक्रारकर्ती मुलगी अथवा तिच्या कुटुंबीयांना या संदर्भात पंचायतीसह इतर कुणीही बेकायदेशीररीत्या सूचना करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असे समाजवादी पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rapist get punishment for 5 shoe hits as penalty by panchayat in haryana