लंडन : करोना विषाणूचे मूळ शोधून काढण्याची मागणी जगभरात लावून धरण्यात येत असतानाच हा विषाणू चीनने जनुकीय अभियांत्रिकीचा वापर करून तयार केल्याचा दावा एका अभ्यास अहवालात करण्यात आला आहे. वुहानच्या  प्रयोगशाळेतील चीनचे वैज्ञानिक यात सामील होते, नंतर त्यांनी तो वटवाघळातूनच आला असे दाखवण्यासाठी त्याचे रूप त्या पद्धतीने बदलले व तो नैसर्गिक वाटेल अशा पद्धतीने त्याची रचना केली, असा गौप्यस्फोट ब्रिटिश प्राध्यापक अँगस डालगेश व नॉर्वेचे वैज्ञानिक बर्गक सोरेनसेन यांनी सादर केलेल्या शोधनिबंधात केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शोधनिबंधात म्हटले आहे की, सार्स सीओव्ही २ म्हणजे करोना विषाणूचा कुठलाही नैसर्गिक पूर्वज नाही. हा विषाणू चीनच्या वैज्ञानिकांनी गेन फंक् शन प्रकल्पात कृत्रिमरीत्या तयार केल्याचे दिसून आले. वुहान येथील प्रयोगशाळेत त्यांनी पहिल्यांदा वटवाघळातील विषाणूंची रचना अभ्यासण्याचा प्रयत्न केला होता. चीनच्या गुहांमध्ये सापडलेल्या वटवाघळांतील विषाणू घेऊन त्याचे रूप काटय़ाप्रमाणे केले. त्याचे रूपांतर नंतर घातक कोविड १९ विषाणूत झाले, नंतर त्यांनी तो नैसर्गिक विषाणू असल्याचा बनाव केला. या संशोधन निबंधात म्हटले आहे, की या विषाणूमध्ये ज्या खुणा आढळतात त्यावरून तरी मानवनिर्मित असल्याचे सिद्ध होते. चीनचे संशोधक वटवाघळातील विषाणूसारखा विषाणू तयार करण्यासाठी रिव्हर्स इंजिनियरिंगचे प्रयोग करीत होते. चीनच्या आतापर्यंतच्या संशोधनाचा पाया दुसरीकडील वस्तू घेऊन त्या उघडून त्यातील रचना पाहून त्यांची नक्कल करणे हाच आहे. तीच पद्धत त्यांनी हा विषाणू तयार करताना वापरली व नंतर तो प्रयोग त्यांच्या अंगाशी आला व हा विषाणू संपूर्ण जगात पसरला.

नंतर या विषाणूबाबतची माहिती नष्ट करण्यात आली. चीनचे वैज्ञानिकही यावर काही बोलायला तयार नाहीत.

‘सायन्स जर्नल क्वार्टरली रिव्ह्य़ू बायोफिजिक्स डिस्कव्हरी’ या नियतकालिकात हा २२ पानांचा शोधनिबंध प्रकाशित होणार आहे. चीनचा गेन फंक् शन प्रकल्प हा नैसर्गिक विषाणूत बदल करण्याचाच होता. त्यामुळे ते जास्त संसर्गजन्य होतात. ओबामा प्रशासनाने हा प्रकल्प बेकायदा असल्याचे म्हटले होते. या विषाणूचे वैशिष्टय़ असे, की त्याच्या काटेरी पृष्ठभागावर चार अमायनो आम्ले असतात व ती धनभारित असतात. ती मानवी पेशीतील ऋणभारित घटकांना जाऊन चिकटतात. त्यामुळे तो विषाणू जास्त संसर्गजन्य होतो. ही अमायनो आम्ले एकमेकांना नष्ट करतात. चार अमायनो आम्ले नैसर्गिक विषाणूत एकाच रांगेत कधीच नसतात. वुहान इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेतील वैज्ञानिकांनीच करोनाचा कृत्रिम विषाणू तयार केला, असा आरोप ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनीही केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Research report claims chinese scientists created virus in lab zws