दिल्ली विमानतळाकडे जात असताना सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील गाडीला एका सुमो गाडीने धडक दिली.  सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसून, स्वतः भागवत सुरक्षित आहेत.
धडक देणाऱया सुमो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची दिल्ली पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
मंगळवारी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला अशाचप्रकारे दिल्ली विमानतळावर जात असताना एका इंडिका कारने धडक दिली आणि यात मुंडे यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर परळीमध्ये अंत्यसंस्कार होत आहेत. ही घटना ताजी असतानाच दिल्लीत पुन्हा एकदा अशा अपघाताची पुनरावृत्ती झाली. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील गाडीला एका सुमो गाडीने धडक दिली. यामध्ये कोणतीही हानी झाली नसली तरी, या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळाकडे जाणाऱया वाहतूकीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss chief mohan bhagwats convoy hit by a car in delhi he is safe