राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विजयादशमीपासून सुरु होणाऱ्या शतक महोत्सवी वर्षाच्या तयारीला लागला आहे. अशात काळाबरोबर जात असताना संघाने आपल्या प्रशिक्षण पद्धतीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. संघ शिक्षा वर्गाची वेळ कमी करणे. दंडुका म्हणजेच संघ स्वयंसेवकाच्या हाती असलेली बांबूच्या काठीचं स्वरुप बदलणं या सगळ्यावर चर्चा सुरु आहे. बांबूची काठी किंवा दंडुका हा संघ गणवेशाचा भाग नाही तरीही दंड ही संघाची ओळख बनला आहे. १३ ते १५ जुलै दरम्यान उटी या ठिकाणी झालेल्या बैठकीत या सगळ्या नव्या सुधारणांवर चर्चा झाली आहे असंही समजतं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वयंसेवकांच्या हाती असलेल्या काठीचं स्वरुप बदलणार?

चर्चा अशीही आहे की दंडुका म्हणजे संघ स्वयंसेवकांच्या हाती असणारी काठी याचं स्वरुपही बदललं जाईल. सध्याच्या घडीला या काठीची उंची ५.३ फूट अशी आहे. ती बदलून तीन फूट केली जाणार आहे आणि त्याला आता यष्टी असं म्हटलं जाईल याबाबत संघाची चर्चा झाल्याचंही समजतं आहे.या बैठकीत तीन फुट उंचीची यष्टी दाखवण्यात आली. आता कदाचित संघ स्वयंसेवकांच्या हाती ही यष्टी दिसू शकते. मात्र त्यावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही.

संघाचं प्रशिक्षण शिबीर किती वेळाचं असतं?

सध्याच्या घडीला पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी संघाचं प्रशिक्षण शिबीर हे २०-२० दिवसांचं असतं. त्यानंतर तिसऱ्या वर्षाचं प्रशिक्षण नागपूरमध्ये होतं. हे प्रशिक्षण २५ दिवस चालतं. सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार पहिल्या वर्षीचं प्रशिक्षण शिबीर १५ दिवस तर द्वितीय आणि तृतीय वर्षाचं प्रशिक्षण शिबीर २० दिवसांचं करण्यावर बैठकीत चर्चा झाली आहे.

पहिल्या वर्षीच्या होणाऱ्या प्रशिक्षणाला संघ शिक्षा वर्ग असं म्हटलं जाईल. तर इतर दोन वर्षांच्या प्रशिक्षणाला कार्यकर्ता विकास शिबीर असं म्हटलं जाईल असंही सूत्रांनी दिलं जाईल. उटी मध्ये झालेल्या बैठकीत दंडुका म्हणजेच स्वयंसेवकांच्या हाती असलेल्या काठीची उंची कमी करण्यावर बरीच चर्चा झाली असंही कळतं आहे. दंडुका हा गणवेशाचा भाग नाही. मात्र दंडुका घेऊन गणवेशातच यायचं आहे असं सांगण्यात येतं. त्यामुळे दंड हा स्वयंसेवकांबरोबर दिसणारा अविभाज्य घटक झाला आहे. या बैठकीत तीन फुट उंचीची यष्टी दाखवण्यात आली. आता कदाचित संघ स्वयंसेवकांच्या हाती ही यष्टी दिसू शकते. मात्र त्यावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिबीरं ही प्रामुख्याने एप्रिल ते जून या कालावधीत होतात. काही कँप हे थंडीच्या मोसमातही आयोजित केले जातात. या वर्षी जे कँप आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये २० हजारांहून अधिक प्रशिक्षणार्थींचा सहभाग होता. उटीमध्ये झालेल्या बैठकीतून परतल्यानंतर काही प्रचारकांनी इंडियन एक्स्प्रेसशी चर्चा केली त्यामध्ये ही माहिती मिळाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss set to revamp reduce training camp time talks on to replace famed dand scj