रूबिक क्यूब या कोडय़ाच्या रूपातील खेळण्याला चाळीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोमवारी गुगलने त्याचे रूबिक क्यूबचे त्रिमिती डुडल सादर केले. हे त्रिमिती डुडल तयार करणे खूप आव्हानात्मक होते, असे डुडल चमूचे प्रमुख रायन जेरमिक यांनी सांगितले.
या खेळण्यातील चौकोनांची रचना ५१९ क्विंटिलियन ( एकवर अठरा शून्य) इतक्या पद्धतींनी करता येते. चौदा वर्षांपूर्वी गुगलने डुडल सुरू केले. यापूर्वी मूग डुडल हे मध्ये सादर करण्यात आले होते, ते संगीत प्रेमींसाठी होते. २०१० मध्ये ‘पॅकमॅन’ या व्हिडिओगेमच्या तिसाव्या वर्षपूर्तीनिमित्त गुगलने डुडल सादर केले होते. रूबिक क्युब हे मुलांचे आवडते कोडे आहे.
त्याच्या चाळिशीनिमित्त सोमवारी त्रिमिती डुडल सादर केले गेले. त्यात वेगवेगळ्या रचना करण्याची सोयही करण्य़ात आली होती, म्हणजे वापरकर्ते ते खेळू शकत होते.डिजिटल स्वरूपात ते प्रथमच तयार करण्यात आले. रूबिक क्युबचा शोध हंगेरीचे शिल्पकार व प्राध्यापक एरनो रूबिक यांनी लावला होता.