युक्रेनच्या सीमेजवळ रशियन इल्युशिन Il-७६ लष्करी वाहतूक विमान कोसळले आहे. संरक्षण मंत्रालयाचा हवाला देत RIA या स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या विमानात युक्रेनियन युद्धकैद्यांना ठेवले होते. या युक्रेनियन युद्धकैद्यांना घेऊन हे विमान बेलग्रूड येथे युक्रेन लष्कराकडे सोपवण्यासाठी घेऊन जात होते. या दरम्यान हा अपघात घडला. या अपघातातील

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरआयएने संरक्षण मंत्रालयाचा हवाला देऊन सांगितले की विमान कोसळले तेव्हा त्यात सहा क्रू सदस्य आणि इतर तीन लोकांसह ६५ युक्रेनियन युद्धकैदी होते. परंतु, विमान कशामुळे कोसळले याची माहिती अद्यापही मिळालेली नाही. रशियन सुरक्षा सेवांशी निगडीत असलेल्या बाझा या वाहिनीने टेलिग्राम मेसेंजर अॅपवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये एक मोठे विमान जमिनीवर पडताना आणि आगीच्या गोळ्यामध्ये स्फोट होत असल्याचे दिसत आहे.

Il-७६ हे लष्करी वाहतूक विमान आहे. सैन्य, मालवाहू, लष्करी उपकरणे आणि शस्त्रास्त्रे वाहून नेण्यासाठी या विमानाचा वापर केला जातो. यात पाच लोकांचा सामान्य क्रू आणि ते ९० प्रवाशांची क्षमता आहे.

स्थानिक गव्हर्नर व्याचेस्लाव ग्लॅडकोव्ह यांनी सांगितले की बेल्गोरोड शहराच्या ईशान्येकडील प्रदेशातील कोरोचान्स्की जिल्ह्यात एक वाईट घटना घडली आहे. अपघातस्थळाची ते पाहणी करणार आहेत. ते म्हणाले की तपास अधिकारी आणि आपत्कालीन कर्मचारी आधीच घटनास्थळी होते. युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या बेल्गोरोड प्रदेशावर अलिकडच्या काही महिन्यांत युक्रेनकडून वारंवार हल्ले होत आहेत. डिसेंबरमध्ये झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात २५ लोक मारले गेले आहेत. तसंच, गेल्या दीड-दोन वर्षांपासून युक्रेन आणि रशियात युद्धी चालू आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russian plane crashes while carrying 65 ukrainian pows sgk