न्याय्य निर्णय होऊ शकणार नाही, असा विश्वास वाटत असल्याने दिग्दर्शक सनल कुमार शशिधरन यांनी त्यांचा सेक्सी दुर्गा  हा चित्रपट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खुले पत्र लिहिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सनल यांचा सेक्सी दुर्गा हा चित्रपट गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. सेक्सी दुर्गा हा चित्रपट खरे तर चित्रपट पुरस्कारात चांगला स्पर्धक ठरला असता पण अतिशय खेदाने हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार स्पर्धेसाठी न पाठवण्याचा निर्णय घेत आहे, असे सनल कुमार शशिधरन यांनी म्हटले आहे. या निर्णयाप्रत येण्याची कारणे तुम्हाला माहिती असतील, तुम्ही हे पत्र वाचाल की नाही हेही माहिती नाही. पण लोकशाही  व विविधतेच्या अस्तित्वावर प्रेम करणारा एक नागरिक म्हणून हे सगळे जाहीर करीत आहे. एस दुर्गा चित्रपटाबाबत न्याय केला जाईल असे वाटत नाही, असे व्यक्तिगत अनुभवावरून वाटते आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले. एस. दुर्गा या चित्रपटाला रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात टायगर पुरस्कार मिळाला होता. जीनिव्हा, मेक्सिको, आर्मेनिया या तीन ठिकाणीही चित्रपट पुरस्कार मिळाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sexy durga movie director sunal kumar letter to the prime minister against the injustice