नेपाळच्या पवित्र नदीतल्या शाळिग्राम शिळेत कोरले जाणार भगवान श्रीराम, जनकपूरवरून येणार धनुष्य | Shaligram rock of nepal river will be use for shri ram statue in ayodhya mandir | Loksatta

नेपाळच्या पवित्र नदीतल्या शाळिग्राम शिळेत कोरले जाणार भगवान श्रीराम, जनकपूरवरून येणार धनुष्य

अयोध्येत बनत असलेल्या भव्य राम मंदिर निर्मितीत भगवान श्रीरामांची सासरवाडी म्हणजेच नेपाळच्या जनकपूरमधील जानकी मंदिर मोठं योगदान देणार आहे.

shaligram rock for ram statue
अयोध्येत बनत असलेल्या भव्य राम मंदिर निर्मितीत भगवान श्रीरामांची सासरवाडी म्हणजेच नेपाळच्या जनकपूरमधील जानकी मंदिर मोठं योगदान देणार आहे.

अयोध्येत बनत असलेल्या भव्य राम मंदिर निर्मितीत भगवान श्रीरामांची सासरवाडी म्हणजेच नेपाळच्या जनकपूरमधील जानकी मंदिर मोठं योगदान देणार आहे. श्रीरामांची मूर्ती बनवण्यासाठी नेपाळमधील कालिगंडकी नदीतल्या दोन मोठ्या शाळिग्राम शिळा अयोध्येत आणल्या जात आहेत. नेपाळमधील कालिगंडकी नदीतून ३५० ते ४०० टन वजनाचा मोठ्या शाळिग्राम शिळा ३१ जानेवारी रोजी अयोध्येत पाठवल्या जाणार आहेत. जनकपूर येथे ३० जानेवारी रोजी या शिळांची चाचणी होणार आहे. त्यानंतर रस्त्याने हे दगड अयोध्येला रवाना होतील.

यासह नेपाळच्या जनकपूरमधील जानकी मंदिराशी संबंधित लोकांनी श्रीरामासाठी धनुष्य बनवून देण्याची इच्छा व्यक्त केली होती. या संदर्भात ३० जुलै रोजी नेपाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विमलेंद्र निधी आणि जानकी मंदिर जनकपूरचे महंत रामतापेश्वर दास यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ नेपाळी जनतेच्या वतीने अयोध्येत जाऊन चंपत राय, स्वामी गोविंददेव गिरी आणि बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांना भेटले होते.

कालिगंडकी नदीतून शिळा शोधण्याचं काम पूर्ण

नेपाळी जनतेच्या भावनांचा आदर करत श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राने कालिगंडकी नदीतून शिळा मागवण्यासाठी जानकी मंदिराला पत्र लिहिलं होतं. टीव्ही ९ भारतवर्षने या पत्राचा हवाला देत ही माहिती दिली आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे महामंत्री चंपत राय यांच्या वतीने जानकी माता मंदिराला कालिगंडकी नदीतील शिळा आणि श्री रामाचा धनुष्य देण्याची विनंती मान्य करण्यात आली आहे.

हे ही वाचा >> Republic Day: पहिल्यांदाच नऊ राफेल विमानांची प्रात्यक्षिकं, जाणून घ्या आणखी खास काय काय घडलं?

शिळा नदीतून काढून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा

आता नेपाळमधील कालिगंडकी नदीतून शिळा शोधून बाहेर काढण्याचं काम पूर्ण झालं आहे. कालिगंडकी नदीच्या काठावर मंत्रोच्चारासह शिळेची विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी तिथले राज्यपाल, मुख्यमंत्री, जानकी मंदिराचे पुजारी आणि अयोध्येहून नेपाळला गेलेले विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ अधिकारी राजेंद्र पंकज सहभागी झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 13:44 IST
Next Story
Pariksha Pe Charcha 2023: “तुम्ही रील्स बघता का? मी पण मोबाईलमध्ये…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला भारतासमोरील चिंतेचा विषय