जम्मू व काश्मीर भाजप प्रदेशाध्यक्षपदी आमदार सत शर्मा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. खासदार जुगलकिशोर शर्मा यांच्या जागी ही निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या लडाख स्वायत्त विकास परिषदेच्या निवडणुकीत भाजपला विजय मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
शर्मा यांच्या नेतृत्वात भाजप बळकट होईल अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी नव्या प्रदेशाध्यक्षांच्या पदग्रहण समारंभात व्यक्त केली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगल्या कामगिरीचे आव्हान त्यांच्यापुढे असेल. पक्षाला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू, असे शर्मा यांनी निवडीनंतर स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2015 रोजी प्रकाशित
जम्मू-काश्मीर भाजपच्या अध्यक्षपदी शर्मा
जम्मू व काश्मीर भाजप प्रदेशाध्यक्षपदी आमदार सत शर्मा यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
Written by मंदार गुरव

First published on: 21-12-2015 at 03:09 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharma became bjp president in jammu and kashmir