कुपवाडा जिल्ह्यतील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हाजी नाका परिसरातील दाट जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या ४१ राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. महाडिक हे मूळचे सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी गावचे रहिवासी आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात दाट जंगलाच्या परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची खबर मिळाल्यानंतर शोधमोहिम हाती घेण्यात आली होती. तिचे नेतृत्त्व कर्नल संतोष महाडिक करीत होते. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र तेथे त्यांना वीरगती प्राप्त झाली. महाडिक यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात झाले. १९९८ मध्ये ते लष्करात विशेष दलात दाखल झाले. अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना याआधी सेना पदकाने गौरविण्यात आले होते.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jan 2016 रोजी प्रकाशित
कर्नल संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्यचक्र
लष्करी सेवेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जवानांना दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 25-01-2016 at 16:31 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shouryachakra to colonel santosh mahadik