एक्सप्रेस वृत्त, नवी दिल्ली : प्रवासी कारमध्ये सहा एअरबॅगची सक्ती करण्याचा निर्णय सरकारने एका वर्षांने लांबणीवर टाकला आहे. १ ऑक्टोबर २०२३पासून नव्या नियमाची अंमलबजावणी केली जाईल, असे केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडकरी यांनी ट्विटरवरून याबाबत घोषणा केली. ‘वाहन उत्पादकांना जागतिक पुरवठा साखळीबाबत भेडसावणाऱ्या समस्या त्याचा अर्थकारणावर होणारा परिणाम विचारात घेऊन प्रवासी कारमध्ये (एम-१ श्रेणी) सहा एअरबॅग सक्तीची अंमलबजावणी १ ऑक्टोबर २०२३पासून होईल. सर्व प्रवाशांची सुरक्षा ही गाडीची किंमत आणि अन्य बाबींपेक्षा अधिक महत्त्वाची आहे,’ असे ते म्हणाले. ६ एअरबॅग दिल्यामुळे गाडीची किंमत वाढेल, असा दावा वाहन उत्पादकांनी केला आहे. मात्र या सक्तीवर गडकरी ठाम आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six airbags forced deployment implementation from 1 october 2023 ysh
First published on: 30-09-2022 at 01:31 IST