भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने (न्यायवृंद) सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नतीसाठी तीन उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या नावांची एकमताने शिफारस केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा, राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ऑगस्टीन जॉर्ज मसिह आणि गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संदीप मेहता यांचा समावेश आहे. या तीन न्यायाधीशांच्या नियुक्तीनंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३४ वर जाईल.

सर्वोच्च न्यायालयात सध्या तीन जागा रिक्त आहेत. संबंधित जागा भरण्यासाठी तीन न्यायाधीशांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय कॉलेजियमने हा निर्णय घेतला आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियममध्ये न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा समावेश होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court collegium recommends three new judges for appointment as apex court judges rmm