आसाराम बापूंवर शस्त्रक्रियेची गरज नाही, असा अहवाल अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने दिल्याने त्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला. आयुर्विज्ञान संस्थेतील तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेला अहवाल अमान्य करण्याचे काहीच कारण नाही, असे न्या. टी.एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठाने म्हटले आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार आठ सदस्यांच्या डॉक्टरांचे पथक स्थापन करण्यात आले होते. आसाराम बापूंवर शस्त्रक्रियेची गरज नाही, त्यांचा आजार औषधोपचाराने बरा होऊ शकतो, असा अहवाल या पथकाने दिला होता.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jan 2015 रोजी प्रकाशित
आसाराम बापूंचा अंतरिम जामीन नामंजूर
आसाराम बापूंवर शस्त्रक्रियेची गरज नाही, असा अहवाल अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने दिल्याने त्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला.
First published on: 21-01-2015 at 12:27 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court rejects interim bail of asaram bapu plea on health grounds