पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लहान मुलांवर असलेले प्रेम आता काही लपून राहिलेले नाही. जेव्हा केव्हा असा एखादा प्रसंग येतो तेव्हा पंतप्रधान मोदी अगदी मनमोकळ्यापणाने मुलांवर प्रेम करतांना दिसले आहेत. अशाचप्रकारे आज देखील पंतप्रधान मोदींनी इंस्टाग्रामवर त्यांना भेटायला आलेल्या एका खास छोट्या दोस्ताचा फोटो शेअर केला आहे. या फोटोखाली मोदींनी म्हटले देखील आहे की, अतिशय खास दोस्त मला भेटायला आज संसदेत आला आहे. या फोटोत मोदी या खास दोस्ताशी काही क्षण खेळतांना देखील दिसत आहेत.

मंगळवारी पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी संसदेत मध्य प्रदेशचे खासदार सत्यनारायण जटिया आले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा, सुन व नातू देखील होते. यावेळी मोदींनी त्यांच्या नातवाला आपल्याजवळ घेतले होते. या भेटीनंतर मोदींनी त्याच्या बरोबर खेळतानाचे फोटो शेअर केले आहेत.

मोदींच्या या टि्वटवर युजर्सनी नोंदवलेल्या काही  प्रतिक्रिया –

 

Beta Trump se Kashmir issue solve nahi ho pana hai. pic.twitter.com/zNKlYA7fDU

— peeyush (@bhadmeinjao09) July 23, 2019

 

इन्स्टाग्रामवरील देखील अनेकांना फोटो आवडला आहे. अनेकांनी तो लाईक केला असून, त्यावर प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.