वाराणसी : वाराणसीच्या न्यायालयाने ज्ञानवापी संकुलात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (एएसआय) सुरू असलेले वैज्ञानिक सर्वेक्षण थांबवण्याची मागणी करणारी ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीची याचिका फेटाळली. जिल्हा सरकारी वकील राजेश मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली.

वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांनी ‘अंजुमन इंतजामिया मशीद कमिटी’ने दाखल केलेल्या याचिकेबाबत स्पष्ट केले, की हे सर्वेक्षण अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केले जात आहे. त्यामुळे या न्यायालयाला या प्रकरणावर सुनावणी घेण्याचे अधिकार नाहीत. सर्वेक्षण करताना नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचा आक्षेप मशीद समितीने घेला होता. या प्रकरणी पुढील सुनावणी ५ ऑक्टोबरला होणार आहे.