नवी दिल्ली : भारतात विकसित करण्यात आलेले तसेच तब्बल ६००० किमी पेक्षा अधिक अंतरावरील लक्ष्यभेद करण्याची क्षमता असलेल्या अग्नी ५ या क्षेपणास्त्राची गुरुवारी ओडिशाच्या समुद्रात अब्दुल कलाम बेटावरुन सकाळी ९.५३ वाजता या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. अग्नी-५ क्षेपणास्त्रात आण्विक हत्यारे वाहून नेण्याची क्षमता आहे. हे क्षेपणास्त्र अँटी बॅलेस्टिक मिसाइल पद्धतीविरोधात कारवाई करता येणार आहे. या क्षेपणास्त्राच्या टप्प्यामध्ये संपूर्ण चीन आणि पाकिस्तान हे देश येतात.
#FLASH India test fired Intercontinental 5000-km range surface to surface nuclear capable ballistic missile Agni-V from Abdul Kalam island off the Odisha coast at 9:53 am. pic.twitter.com/kkBi2NDFRT
— ANI (@ANI) January 18, 2018
अग्नी मालिकेतील क्षेपणास्त्रे डीआरडीओने विकसित केली आहेत. पृथ्वी आणि धनुष सारख्या लघु पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांशिवाय भारताच्या खात्यात अग्नी-१, अग्नी-२ आणि अग्नी-३ ही क्षेपणास्त्रे आहेत. पाकिस्तानच्या कुरापती लक्षात घेऊन यांची निर्मिती करण्यात आली आहे. तर, अग्नी-४ आणि अग्नी-५ या क्षेपणास्त्रांची निर्मिती चीनला लक्षात घेऊन करण्यात आली आहे.
We have successfully launched nuclear capable ballistic missile Agni-V today: Defence Minister Nirmala Sitharaman in Chennai (File pic) pic.twitter.com/6KivWbmZg6
— ANI (@ANI) January 18, 2018
या अग्नी-५ क्षेपणास्त्राची क्षमता आवाजाच्या वेगापेक्षा २४ टक्के जास्त आहे. याची उंची १७ मीटर असून व्यास २ मीटर आहे. तर याचे वजच ५० टन इतके आहे. दीड टनांपर्यंतचे अण्वस्त्र वाहून नेण्याची याची क्षमता आहे.