आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, गाडीतून कचरा बाहेर फेकू नका या माध्यामातून अनेकदा जनजागृती करुनही गाड्यांमधून रस्तावर कचरा फेकणाऱ्या सुशिक्षितांचे प्रमाण कमी नाही. मात्र अशाप्रकारे गाडीच्या खिडकीमधून रस्त्यावर कचरा फेकणं दोन तरुणांना चांगलचं महागात पडलं. कर्नाटकमधील काडागाडाळू येथून जाताना धावत्या गाडीमधूनच दोन तरुणांनी पिझ्झाचे रिकामे बॉक्स रस्त्यावर फेकले. मात्र पुढे जाऊन या तरुणांना आडवण्यात आलं आणि हे बॉक्स उचलण्यासाठी त्यांना पुन्हा ८० किमीचा उलट प्रवास करावा लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोडागू टुरिस्ट असोसिएशनचे सरचिटणीस असणाऱ्या मडेतीरा थिममैया यांनी बेंगळुरु मिररला यासंदर्भात माहिती दिली. मागील बुधवारी काडागाडाळू या गावातील ग्रामस्तांनी त्यांच्या गावातून जाणाऱ्या रस्त्याची साफसफाई केली होती. मात्र याच रस्त्यावर शुक्रवारी दोन तरुणांनी गाडीमधून कचरा फेकला. “या परिसरामध्ये रस्त्यावर कोणी कचरा करु नये म्हणून विशेष जागृक असतो. आमचे गाव हे उंच थंड हवेच्या ठिकाणी आहे. शुक्रवारी या रस्त्यावरुन दुपारी सव्वा दोनच्या सुमारास प्रवास करत असतानाच मला रस्त्याच्या बाजूला काही पिझ्झाचे बॉक्स फेकलेले दिसले. तो कचरा पाहून आम्ही घेतलेली सर्व मेहनत वाया गेल्यासारखे आम्हाला वाटले. त्यामुळे मी तो कचरा उचलला आणि ते बॉक्स उघडले. आतमध्ये मला बील सापडलं ज्यावर ग्राहकाचा फोन नंबर होता. मी त्या व्यक्तीला फोन करुन परत येऊन कचरा उचला अशी विनंती केली. मात्र फोनवरील व्यक्तीने कचरा फेकण्यासाठी माफी मागितली. पण आपण कोडागू सोडून बरेच पुढे आल्याचे सांगत परत येऊन कचरा उचलण्यास नकार दिला. त्यानंतर मी स्थानिक पोलिसांना फोन करुन यासंदर्भातील माहिती दिली. त्यांनाही या तरुणांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यानंतर आम्ही सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांची माहिती जाहीर केली आणि त्याचा परिणाम झाला. ते परत आले आणि त्यांनी कचरा उचलला,” असं माडेतीरा म्हणाले.

सोशल मिडियावर या तरुणांचा फोन नंबर शेअर करण्यात आला. अनेकांनी या क्रमांकावर फोन करुन दोघांनी परत जाऊन कचरा उचला अशी विनंती करण्यास सुरुवात केली. सतत येणाऱ्या फोन्सला कंटाळून हे दोघे दुपारी पावणे चारच्या सुमारास कचरा फेकलेल्या ठिकाणी परतले. म्हणजेच त्यांनी मादिकेरी ते काडागाडाळू हा ८० किमी प्रवास केला. “हे तरुण हे बॉक्स पुन्हा फेकतील म्हणून आम्ही त्या बॉक्सवर त्यांचे नाव आणि फोन नंबर लिहून त्यांना पुन्हा हा कचरा रस्त्यावर फेकू नका असा इशारा दिला,” असंही मडेतीरा यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Think twice before littering duo travelled back around 80 km scsg