सीरियातील रासायनिक शस्त्रांची यादी करून त्यांची तपासणी करण्याच्या मोहिमेस बुधवारी प्रारंभ झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांनी या कामी भाग घेतला आहे. सीरियातील शस्त्रे २०१४च्या मध्यापर्यंत नष्ट करण्याचे ठरले असून त्यानुसार ही यादी करण्यात येणार आहे.‘ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स’ या हेगस्थित संघटनेतील १९ जणांच्या तज्ज्ञ पथकाचे दमास्कस येथे आगमन झाले. सीरियातील रासायनिक शस्त्रे नष्ट करण्यासंबंधी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने केलेल्या ठरावास अनुसरून ही पाहणी करण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Oct 2013 रोजी प्रकाशित
सीरियातील रासायनिक शस्त्रांच्या तपासणीस प्रारंभ
सीरियातील रासायनिक शस्त्रांची यादी करून त्यांची तपासणी करण्याच्या मोहिमेस बुधवारी प्रारंभ झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांनी या कामी भाग घेतला आहे.

First published on: 03-10-2013 at 12:47 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To take care of chemical weapons stockpile inspectors arrive at syria