टर्की आणि सीरियातल्या महाविनाशकारी भूकंपामुळे झालेल्या मृतांची संख्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. शुक्रवारी सकाळपर्यंत मृतांची संख्या ४१ हजारांच्या पुढे गेली आहे. एकट्या टर्कीमध्ये ३८,०४४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सीरियात आतापर्यंत ३,६८८ लोकांचा मृत्यू झाला आहे. भीषण भूकंपानंतर जगभरातले देश टर्कीच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. संयुक्त राष्ट्राने देखील हे संकट दूर करण्यासाठी १०० कोटी डॉलर्स इतक्या मदतीचं आवाहन केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एएफफी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुरेटेस यांनी शुक्रवारी एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनात यांनी म्हटलं आहे की, “गरजा मोठ्या आहेत, लोक त्रस्त आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण जर इतकी मदत करू शकलो तर ५५ लाख लोकांना मदत मिळेल. मी आंतरराष्ट्रीय समुदायाला विनंती करतो की, आपल्या काळातील या सर्वात मोठ्या नैसर्गिक आपत्तींपैकी एक असलेल्या या आपत्तीमुळे पीडितांना मदत करण्यासाठी पुढे यावं.”

टर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांनी जाहीर केले, देशाच्या स्थापनेनंतर गेल्या शतकातील ही सर्वात भयानक आपत्ती आहे. पडलेल्या इमारतींचा मलबा हटवण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने मृतांचा आकडा आणखीही वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर रुग्णालयात असलेल्या गंभीर जखमींपैकी बऱ्याचं जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. टर्की-सीरिया या दोन्ही देशांतील एकूण भूकंपबळींची संख्या ४१ हजारांवर गेली आहे.

हे ही वाचा >> जगात पुन्हा भारताचा डंका! यूट्यूबच्या CEO पदी भारतीय वंशाच्या नील मोहन यांची नियुक्ती

भारताचं ‘ऑपरेशन दोस्त’

टर्कीच्या मदतीसाठी भारतही पुढे आला आहे. टर्कीच्या मदतीसाठी भारताने ऑपरेशन दोस्त ही मोहीम हाती घेतली आहे. भूकंपबाधित परिसरात भारतीय सेना आणि एनडीआरएफची बचाव पथकं मोर्चा सांभाळत आहेत. भारताने टर्की आणि सीरीया या दोन्ही देशांसाठी मोठ्या प्रमाणात मदत सामग्री उपलब्ध करून दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Turkey and syria earthquake death toll jumps to 41000 un appeals for help asc