Twitter Blue Tick: Twitter हे एक मायक्रोब्लॉगिंग सोशल साईट आहे. एलॉन मस्क हे ट्विटरचे सीईओ आहेत. कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत काही ना काही निर्णय घेत असते. आता कंपनीने असाच एक निर्णय घेतला आहे ज्यामुळे वापरकर्त्यांना दिलासा मिळणार आहे. तर ट्विटरने वापरकर्त्यांबाबत काय निर्णय घेतला आहे ते जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Twitter ने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. कंपनी लवकरच blue tick काढून टाकू शकते. एका सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ट्विटरने म्हटले आहे की, १ एप्रिलपासून जगभरात LegacyBlue बंद करण्यात येणार आहे. तसेच ट्विटरने व्हेरीफाईड अकाउंट्ससाठी जगभरामध्ये सब्स्क्रिप्शन मॉडेल सुरू केले आहे.

हेही वाचा : 5G सेवेमध्ये Airtel ने रिलायन्स जीओला मागे टाकले, ‘इतक्या’ शहरांत हायस्पीड इंटरनेट सेवा सुरू

ट्विटरने हे पाऊल उचलल्यामुळे वापरकर्त्यांना महिन्याला पैसे भरावे लागणार आहेत. सब्स्क्रिप्शन घेणाऱ्या वापरकर्त्यांना कंपनी काही खास फीचर्स देखील देणार आहे. यामध्ये जाहिराती दिसण्याचे प्रमाण कमी होणार आहे. तसेच ट्विट पोस्ट करण्याआधी लिहिण्यासाठी अधिक शब्द वापरता येणार आहेत. तसेच तुम्हाला ट्विट एडिट देखील करता येणार आहे. या फीचर्ससह व्हेरीफाईड अकाउंट्ससाठी कंपनी अजूनही काही फीचर्स देऊ शकते.

जर का तुम्हाला तुमच्या अकाउंटवर ब्लू टिक ठेवायचे असेल तर १ एप्रिलआधी तुम्हाला ट्विटर ब्लू चे सब्स्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे. भारतातातील वेब वापरकर्त्यांना ट्विटर ब्लू साठी दर महिन्याला ६५० रुपये आणि Android आणि iOS वापरकर्त्यांना दर महिन्याला ९०० रुपये मोजावे लागणार आहेत. ट्विटरच्या या निर्णयामुळे प्रसिद्ध व्यक्ती, पत्रकार, सरकारी अधिकारी आणि सामान्य लोकांना यापूर्वी मोफत ब्लु टिक मिळत होती त्यासाठी त्यांना आता पैसे मोजावे लागणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter remove legacy verified blue tick 1 april 2023 elon musk and start subscription plans tmb 01