कुंडा हत्याकांडप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाने दोन भावांना अटक केली असून त्यामुळे या प्रकरणास वेगळे वळण लागले आहे. जमिनीच्या तंटय़ावरून बालीपूर गावाचा प्रमुख नन्हे यादव यास दोघांनी ठार मारल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात उत्तर प्रदेशचे विभागीय पोलीस उपायुक्त झिया उल हक यांची हत्या करण्यात आली होती. यादव याच्या हत्येप्रकरणी अजय पाल आणि विजय पाल या दोघांना अटक करण्यात आली. नन्हे यादवच्या हत्येप्रकरणी कामता पाल याच्यावर संशय असून हे दोघे भाऊ कामताचे मुलगे आहेत. या दोघांकडून काही सीमकार्डे, पुंगळ्या आणि अन्य आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 8th Apr 2013 रोजी प्रकाशित
कुंडा हत्याकांड : दोघा भावांना अटक
कुंडा हत्याकांडप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाने दोन भावांना अटक केली असून त्यामुळे या प्रकरणास वेगळे वळण लागले आहे. जमिनीच्या तंटय़ावरून बालीपूर गावाचा प्रमुख नन्हे यादव यास दोघांनी ठार मारल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात उत्तर प्रदेशचे विभागीय पोलीस उपायुक्त झिया उल हक यांची हत्या करण्यात आली होती.
First published on: 08-04-2013 at 01:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two more people arrested in kunda murder case