आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्हय़ात १२ वर्षांच्या मुलीवर एका युवकाने बलात्कार केला तर नवविवाहित महिलेवर दोघांनी सामूहिक बलात्कार केला, असे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी रात्री या दोन घटना घडल्या असून त्याबाबत अजून कुणाला अटक करण्यात आली नाही. अल्पवयीन मुलगी शेतमजूर असून ती थोरेडु या खेडय़ात काम करते. तिच्यावर एम वेणू रंगराजन मंडल याने ती दुकानातून दही घेऊन परत जात असताना बलात्कार केला. वेणू याने तिला जबरदस्तीने सायकलवर बसवले व दूरवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला असे राजनग्राम परिक्षेत्राचे निरीक्षक नागा मुरली यांनी सांगितले. नंतर ही मुलगी घरी परतली व तिने घडला प्रकार आईवडिलांना सांगितला. त्यांनी वेणू याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली असून वेणू हा फरार आहे. त्याला पकडण्याचे प्रयत्न चालू आहेत. दुसऱ्या एका घटनेत राजनगरम येथील लाला चेरूवू भागात एका विवाहित महिलेवर दोघांनी सामूहिक बलात्कार केला. ही महिला तिच्या पतीशी भांडून घर सोडून जात असताना रेल्वे स्टेशनवर आली तेव्हा पहाटेची वेळ होती. ती एका रिक्षात बसली. रिक्षाचालक दारू प्यालेला होता. त्याने व आणखी एकाने तिला रस्त्याच्या कडेला ओढत नेऊन सामूहिक बलात्कार केला. या महिलेने नंतर तक्रार दाखल केली. तिला तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही आरोपी फरार आहेत असे पोलिसांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two rape cases in andhra