जम्मू-काश्मीरच्या शोपियाँमध्ये सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. या ठिकाणी दुपारपर्यंत चकमक सुरुच होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काश्मीरचे पोलीस अधिकारी एस. पी. पानी म्हणाले, या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि दारुगोळा सापडला असून तो जप्त करण्यात आला आहे. ठार झालेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून चौकशी सुरु करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सीमेवर पुन्हा दहशतवाद्यांनी डोके वर काढले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two terrorists have been killed by security forces in shopian at jammu and kashmir