वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या अफशान खान यांची संयुक्त राष्ट्रांच्या ‘पोषण वर्धन मोहिमे’च्या समन्वयकपदी नेमणूक केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सेक्रेटरी जनरल अंतोनियो गुटेरेस यांनी त्यासंबंधी घोषणा केली. अफशान खान यांच्याकडे कॅनडा आणि ब्रिटनचे नागरिकत्व आहे. ‘पोषण वर्धन मोहीम’ कुपोषण असलेल्या ६५ देशांमध्ये राबवण्यात येते, त्यामध्ये भारताच्या चार राज्यांचाही समावेश आहे. सर्व प्रकारच्या कुपोषणाचे २०३० पर्यंत उच्चाटन करणे हे या मोहिमेचे लक्ष्य आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्व संबंधितांना सहभागी करून, जगातील सर्व प्रकारचे कुपोषण थांबवण्यासाठी पोषण वर्धन रणनीतीची अंमलबजावणी करणे हे अफशान खान यांचे काम असेल. त्यांनी मॅकगिल विद्यापीठातून राज्यशास्त्रामध्ये पदवी घेतल्यानंतर सार्वजनिक धोरण या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. अफशान खान यांनी १९८९ मध्ये मोझाम्बिक येथे युनिसेफसाठी काम करायला सुरुवात केली. सध्या त्या पूर्व युरोप आणि मध्य आशियामध्ये कार्यरत आहेत. ‘विमेन फॉर विमेन इंटरनॅशनल’ या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Un appoints indian origin afshan khan coordinator for scaling up nutrition movement zws