संयुक्त राष्ट्रसंघात ऐतिहासिक मतदानानंतर गांजाला (भांग) धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने (CND) बुधवारी हा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेल्या शिफारशीनंतर संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवले आहे. यासाठी झालेल्या मतदानात २७ देशांनी गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यासाठी समर्थन दिले तर उर्वरित देशांनी याविरोधात मतदान केले. विशेष म्हणजे यावेळी भारतानेही गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्याच्या समर्थनार्थ मतदान केलं. तर, चीन,पाकिस्तान आणि रशिया यांसारख्या २५ देशांनी विरोधात मतदान केले. “या ऐतिहासिक मतदानानंतर गांजाच्या औषधी व उपचारात्मक क्षमतेची पडताळणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे”, असं संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटलं आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या या निर्णयानंतर गांजा किंवा भांगपासून बनलेल्या औषधांचा वापर वाढू शकतो. याशिवाय गांजाच्या साइंटिफिक रिसर्चसाठीही चालना मिळू शकते. या निर्णयानंतर अनेक देश गांजा किंवा भांगच्या वापराबाबतच्या आपल्या पॉलिसीमध्ये बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गांजाचे तोटे आणि त्याच्या वैद्यकिय फायद्यांबाबत मोठी चर्चा सुरू आहे. सध्या ५० पेक्षा जास्त देशांनी गांजाचं वैद्यकीय महत्त्व समजून घेत गांजाला वैध ठरवलं आहे. कॅनडा, उरूग्वे आणि अमेरिकेच्या १५ राज्यांमध्ये वैद्यकीय वापरासाठी गांजाला परवानगी देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Un decides cannabis not a dangerous narcotic india too votes to reclassify sas