अमेरिकेत एअर फोर्समध्ये, भारतीय वंशाच्या सदस्याला ड्युटीवर असताना टिळा लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. वायोमिंगमधील एफई वॉरेन एअर फोर्स बेसवर तैनात असलेल्या यूएस एअर फोर्स एअरमन दर्शन शाह यांना ड्युटीवर असताना त्यांना टिळक चांदलो लावण्याची परवानगी देऊन धार्मिक सवलत देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


दोन वर्षांपूर्वी सेवेत रुजू झाल्यापासून, दर्शन, ९० व्या ऑपरेशनल मेडिकल रेडिनेस स्क्वाड्रनला नियुक्त केलेले एरोस्पेस वैद्यकीय तंत्रज्ञ आहेत. ऑनलाइन ग्रुप चॅटद्वारे त्यांनी धार्मिक सवलतीची विनंती केल्याने शाह यांना जगभरातून पाठिंबा मिळाला. २२ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांना पहिल्यांदा गणवेशात असताना टिळा लावण्याची परवानगी देण्यात आली. रिपब्लिक वर्ल्डने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.


“टेक्सास, कॅलिफोर्निया, न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कमधील माझे मित्र मला आणि माझ्या पालकांना संदेश देत आहेत की हवाई दलात असे काहीतरी घडल्याने त्यांना खूप आनंद झाला आहे. हे काहीतरी नवीन आहे. हे असे काहीतरी आहे जे त्यांनी यापूर्वी कधीही ऐकले नव्हते किंवा ते शक्य आहे असे वाटले देखील नाही, परंतु ते घडले”, अशी प्रतिक्रिया दर्शन शाह यांनी दिली आहे.


शाह यांचे पालनपोषण मिनेसोटा येथील एडन प्रेरी येथे बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तन स्वामीनारायण संस्था किंवा BAPS चे पालन करणाऱ्या गुजराती कुटुंबात झाले.या पंथाचे धार्मिक चिन्ह लाल टिळा किंवा “चांदलो” आहे, जो नारिंगी U-आकाराच्या टिळ्यांनी वेढलेला आहे. जून २०२० मध्ये मूलभूत लष्करी प्रशिक्षण सुरू केल्यापासून, ते गणवेशात असताना टिळा आणि चांदलो लावण्याची परवानगी देण्यासाठी सवलतीची मागणी करत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us air force permits indian origin hindu airman to wear tilak while in uniform vsk