मोदी-आदित्यनाथ भेटीमुळे चर्चा

उत्तर प्रदेश मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असल्याच्या  पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यापाठोपाठ आदित्यनाथ यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदित्यनाथ यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती, भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांची भेट घेण्यासाठी आदित्यनाथ दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत.

काँग्रेसचे माजी नेते जितीन प्रसाद यांनी पक्षाला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आदित्यनाथ येथे आले आहेत. उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी प्रसाद आणि मोदी यांचे विश्वासू ए. के. शर्मा यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh cabinet prime minister narendra modi union home minister amit shah bjp national president j p nadda akp