ज्येष्ठ अभिनेते विश्व मोहन बडोला यांचे निधन झाले आहे. त्यांचा मुलगा अभिनेता वरुण बडोलाने सोशल मीडिया पोस्टद्वारे वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. विश्व मोहन बडोला यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
वरुणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांचा फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहिली आहे. ‘अनेकजण तक्रार करतात की त्यांची मुले त्यांचे ऐकत नाही. पण अनेकजण हे विसरतात की त्यांची मुले नेहमी त्यांना पाहूनच शिकत असतात. माझ्या वडिलांनी कधीच मला समोर बसवून काही शिकवले नाही. शिकत राहणे हाच जगण्याचा योग्य मार्ग आहे असल्याचे त्यांनी मला शिकवले’ या आशयाची पोस्ट त्याने लिहिली आहे.
विश्व मोहन बडोला हे अतिशय लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी ‘स्वदेश’, ‘जोधा अकबर’, ‘जॉली एलएलबी’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘लेकर हम दीवाना दिल’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी अनेक नाटक आणि मालिकांमध्ये देखील काम केले आहे.