भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. त्यामुळे आता लंडनमधील आलिशान घरही त्याच्या हातातून गेले आहे. स्विस बँक यूबीएससोबत दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर वादात ब्रिटीश न्यायालयाने मल्ल्याचा अर्ज फेटाळला आहे. हे घर खाली करण्याचा आदेश काढण्यात आला होता. या आदेशावर स्थगिती आणण्यात यावी, अशी मागणी मल्ल्याने केली होती. परंदू ब्रिटिश न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे मल्ल्या लंडनमधील त्याच्या आलिशान घरासाठी कायदेशीर लढाई हरला आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजय मल्ल्याच्या याचिकेवर, लंडन उच्च न्यायालयाच्या चॅन्सरी विभागाचे न्यायाधीश मॅथ्यू मार्श यांनी निर्णय दिला. कर्जाची रक्कम परत करण्यासाठी मल्ल्या कुटुंबाला आणखी वेळ देण्यासाठी कोणतेही कारण नाही, असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे हा आलिशान बंगला मल्ल्याच्या हातातून गेला आहे. विजय मल्ल्यावर स्विस बँकेचे सुमारे २०४ दशलक्ष पौंडांचे कर्ज आहे. या कर्जाची परतफेड त्याला करावी लागणार आहे. हे प्रकरण मल्ल्याची कंपनी असलेल्या रोझ कॅपिटल व्हेंचर्सने घेतलेल्या कर्जाशी संबंधित आहे. ज्यामध्ये किंगफिशर एअरलाइन्सचे माजी मालक विजय मल्ल्या, त्यांची आई ललिता आणि मुलगा सिद्धार्थ मल्ल्या यांना मालमत्ता ताब्यात घेण्याच्या अधिकारासह सह-प्रतिवादी म्हणून सूचीबद्ध करण्यात आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay mallya may lose plush london home over unpaid loans hrc
First published on: 19-01-2022 at 10:45 IST