“मी भाजपात प्रवेश न केल्याने मला तिहार तुरुंगात टाकलं;” काँग्रेस नेत्याचा दावा

आपण भाजपाला पाठिंबा दिला नाही, तसेच भाजपात प्रवेश केला नाही, त्यामुळे त्यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आले, असा दावा या काँग्रेस नेत्याने केला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

आपण भाजपाला पाठिंबा दिला नाही, तसेच भाजपात प्रवेश केला नाही, त्यामुळे त्यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आले, असा दावा कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी सोमवारी केला आहे. यावेळी त्यांनी भाजपावर टीका करत राज्यातील भाजपा सरकारला देशातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हटले आहे. “मी तिहार तुरुंगात गेलो कारण भाजपाने मला पाठवले. मी तुम्हाला पाठिंबा दिला नाही, तुमच्यासोबत आलो नाही, त्यामुळे तुम्ही मला तुरुंगात टाकले,” असं शिवकुमार यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री यांच्या वक्तव्याला उत्तर देताना सांगितले. डीके शिवकुमार तिहार तुरुंगात का गेले होते, असा सवाल भाजपा नेत्यांनी केला होता.

भाजपामध्ये प्रवेश केला असता तर तुरुंगात गेले नसते का, असे विचारले असता शिवकुमार म्हणाले, “सर्व काही सर्वांना माहित आहे आणि त्याचे रेकॉर्ड देखील आहेत.” द न्यूज मिनीटने याबाबत वृत्त दिलंय. पुढे, राज्य कंत्राटदार संघटनेने लावलेल्या किकबॅक शुल्काच्या निष्पक्ष चौकशीची मागणी करत शिवकुमार यांनी कर्नाटकातील सध्याचे भाजप सरकार या देशातील सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, डीके शिवकुमार यांना ईडीने ३ सप्टेंबर २०१९ रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्याच वर्षी २३ ऑक्टोबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Was sent to tihar jail for not supporting or joining bjp says congress leader dk shivakumar hrc

Next Story
‘जय श्रीराम’ म्हणत जमावाने केली कॅथलिक शाळेची तोडफोड; बजरंग दलाचे चार जण ताब्यात
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी