Israel – Palestine News in Marathi : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या अनेक नागरिकांचा या युद्धात हकनाक जीव गेला आहे. अगदी प्रियजनांच्या डोळ्यांदेखत दहशतवाद्यांनी हत्या घडवून आणल्या आहेत. ज्यांच्या डोळ्यांदेखत हत्या झाल्या आहेत त्यांच्या स्मृतीतून या कटू आठवणी कदापि अस्पष्ट होऊ शकणार नाहीत. लहान मुलांच्या देखतही त्यांच्या आई-वडिलांच्या हत्या घडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. इस्रायल राज्याच्या अधिकृत X खात्यावरही असाच एक व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यात एका अल्पवयीन मुलीने डोळ्यांदेखत तिच्या वडिलांची हत्या कशी झाली हे सांगितलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनिवारी डारिया तिच्या वडिलांना (ड्विर करप) भेटायला किबुत्झमध्ये गेली होती. याच दिवशी हमासने इस्रायलवर क्षेपणास्र डागले होते. आजाबूजाला काहीतरी विचित्र घडतंय हे पाहून तिच्या वडिलांनी डारिया आणि तिच्या भावाला उठवून शेल्टर होममध्ये जाण्यास सांगितलं. तसंच, त्यांनी कुऱ्हाड आणि चाकूही सोबत ठेवले होते. काही घडलं तर स्वसंरक्षणासाठी त्यांनी ते अस्र ठेवलं होतं.

हेही वाचा >> “…तोवर तुमचं पाणी, इंधन आणि वीज बंद”, इस्रायलच्या ऊर्जामंत्र्यांचा पॅलेस्टाईनला इशारा

“मी परत झोपी गेले. पण जेव्हा मला जाग आली तेव्हा हातात कुऱ्हाड आणि चाकू घेऊन वडील दहशतवाद्यांच्या दिशेने पळताना दिसले. दहशतवाद्यांनी माझ्या वडिलांना गोळ्या घातल्या. वडिलांसोबत त्यांची मैत्रीण स्टॅव्हही होती. पण तिचं काय झालं हे आम्ही पाहू शकलो नाही. हे सगळं मी ब्लँकेटमध्ये लपून पाहत होते. दहशतवादी आमच्या दिशेने आले. त्यांनी ब्लँकेट वर करून पाहिलं आणि परत ब्लँकेट खाली टाकलं नि निघून गेले. तेवढ्यात मी माझ्या आईला मेसेज पाठवला की “आई, मी डारिया… त्यांनी वडिलांची आणि स्टॅव्हची हत्या केली. मदत कर!”

हेही वाचा >> Israel Hamas War : ‘हे’ सहा शक्तीशाली देश इस्रायलच्या बाजूने, तर सात राष्ट्रांचा पॅलेस्टाईनला पाठिंबा?

दहशतवादी घरातून निघून गेले तेव्हा त्यांनी स्टॅव्हच्या लिपस्टिकचा वापर करून भिंतीवर लाल रंगात काहीतरी लिहिलं होतं. “अल-कासमचे लोक लहान मुलांची हत्या करत नाहीत”, असं त्यांनी भिंतीवर लिहिलं होतं, अशी माहितीही डारियाने दिली.

डारिया आणि तिच्या भावाला वाचवण्याच्या प्रयत्नात ड्विर आणि स्टॅव्ह मरण पावले. हा दिवस तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट शनिवार असल्याचं ती अल्पवयीन मुलीग म्हणाले. “मला भीती वाटत होती की मी माझ्या आईला आणि इतर कोणालाच पुन्हा कधीही भेटणार नाही.”

गाझा पट्टीत नाकाबंदी

इस्रायलने एका बाजूला गाझा पट्टीची नाकेबंदी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला युद्ध परिस्थिती हाताळण्यासाठी आपत्कालीन युद्ध सरकार स्थापन केलं आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि विरोधी पक्षनेते बेनी गॅंट्झ यांनी हमासच्या दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी आपत्कालीन युद्ध सरकार बनवलं आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर क्षेपणास्र डागल्यानंतर इस्रायलच्या हवाई दलानेही गाझा पट्टीतील हमासच्या तळांवर हवाई हल्ले सुरू केले. त्यापाठोपाठ इस्रायलनं सपूर्ण नाकेबंदीचं हत्यार उपसलं आहे. त्यामुळे हमासची गाझा पट्टीत चांगलीच कोंडी झाली आहे. इस्रायलचे संरक्षणमंत्री योआव गॅलंट यांनी गाझा पट्टीत संपूर्ण नाकेबंदीचे आदेश दिले आहेत. तिथली वीज बंद करण्यात आली आहे. तिथला अन्नपुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच इंधनपुरवठाही बंद करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We were watching through the blanket with father in his eyes the minor girl recounted the thrill of the murder sgk