इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप गेल्या काही दिवसांपासून आपल्या नियम आणि अटी मोडणाऱ्या वापरकर्त्यांविरोधात गंभीर पाऊल उचलताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून व्हॉट्सअॅपने जूनमध्ये २२ लाखांहून अधिक भारतीयांची खाती बंद केली आहेत. या वापरकर्त्यांनी कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केले होते त्यामुळे कंपनीकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
हा अहवाल१ जून ते ३० जून पर्यंतचा आहे. मेसेजिंग अॅपने मे महिन्यात १९ लाख खाती, एप्रिलमध्ये १६ लाख खाती आणि मार्चमध्ये अशी आणखी १८.०५ लाख खाती बंद केली होती. केवळ जून महिन्यात जवळजवळ २ लाखांहून अधिक भारतीय व्हॉट्सअॅप खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. वापरकर्त्यांनी केलेल्या तक्रारींच्या आधारे व्हॉट्सअॅपने खाती बंद केल्याचे उघड झाले आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर कंपनी वापरकर्त्यांना थेट खाते बंद करण्याची नोटीस पाठवत नाही तर. सर्वप्रथम संबंधित विषय तज्ञांशी संपर्क साधला जातो आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच संबंधित खाते बंद करण्यासाठी पाऊल उचलले जाते.
नवीन आयटी नियमामुळे बदल
गेल्या वर्षी लागू झालेल्या नवीन आयटी नियम लागू करण्यात आले आहेत. दर महिन्याला कंपनीकडून नियमांचा अहवाल प्रकाशित केला जातो. कंपनीने ५ लाखहून अधिक वापरकर्त्यांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, अद्यापही काही वापरकर्ते द्वेषयुक्त भाषण, चुकीची माहिती आणि खोट्या बातम्यां पसरवत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे कंपनीने अशा वापरकर्त्यांची खाती बंद केली आहेत.
हेही वाचा- भारतात BGMI वर बंदी; Google आणि Apple ने प्लेस्टोअर मधून ॲप टाकले काढून
आपले खाते बंद होऊ नये यासाठी काय करावे?
जर कोणी बेकायदेशीर, अश्लील, बदनामीकारक, धमकी देणारा, धमकावणारा, त्रास देणारा आणि द्वेष पसरवणारा, वांशिक किंवा वांशिक भेदभाव करणारा असेल तसेच कोणताही बेकायदेशीर किंवा चुकीचा मजकूर शेअर करत असेल, तर त्याच्या खात्यावर बंदी घालण्यात आली आहे. तुम्हालाही तुमचे खाते सुरक्षित ठेवायचे असेल तर, अशा कोणत्याही प्रकारच्या मेसेजना प्रोत्साहन देऊ नका.
अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊ शकता
व्हॉट्सअॅपवर आलेला कोणत्याही संदेश, माध्यम किंवा व्यक्तींमुळे तुम्हाला त्रास होत असेल, तर तुम्ही व्हॉट्सअॅप तक्रार अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊ शकतात.