अनेक वेळा परीक्षांच्या निकालानंतर मुलींनी मारली बाजी, यंदाही मुलीच पुढे अशा आशयाच्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळत असतात. यावेळी सुद्धा देशभरात लॉकडाऊन असल्याने अनेक ठिकाणी शैक्षणिक संस्था बंद आहेत. मात्र मूल्यांकनांद्वारे किंवा प्रत्यक्ष परीक्षा घेण्यात आल्या. त्यानंतर आता अनेक माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षांचे निकाल हाती आले आहेत. दरवर्षीप्रमाणे, निकालात मुली आघाडीवर आहेत. वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET च्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. मुलांपेक्षा मुलींनी चांगली कामगिरी केल्याचे अनेक परीक्षांमध्ये दिसून आले आहे. मुली फक्त वरच्या यादीत स्थान मिळवतात असे नाही, यामध्ये टक्केवारीचाही फरक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असे काय आहे जे मुलींना स्पर्धेचे नेतृत्व करण्यास प्रवृत्त करते? किंवा मुले आरामशीर आणि शांत आहेत? हे खरे नाही असे मानसोपचार तज्ञ सांगतात असे न्यूज १८ने म्हटले आहे.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ पद्माक्षी लोकेश म्हणतात की “दोघांमधील उत्कृष्ट कामगिरी किंवा गुण मिळवण्याच्या क्षमतेमधील अंतर खूप कमी आहे. सध्याच्या जगात स्पर्धा इतकी उच्च आहे की मुले आणि मुली दोघेही उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. पण, दुसरीकडे मुली अधिक संघटित आहेत. ते स्पष्टपणे त्यांच्या ध्येयावर केंद्रित आहेत आणि सुरुवातीपासूनच काम करतात. मुले मेहनती असली तरी त्यांना एकत्र येऊन अभ्यास करण्यामध्ये अधिक रस आहे आणि त्यांना त्यांच्या मित्रांना सोबत घ्यायचे असचत. मुली त्यांच्या लक्षावर अधिक केंद्रित असतात, त्यांना स्वतःसाठी लक्ष पूर्ण करायचे असते आणि त्या मैत्री किंवा एकत्र येऊन अभ्यास करण्यामुळे विचलित होत नाहीत.”

पण हे एवढेच नाही आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरांतील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने स्पर्धा करतात. संसाधनांची, मार्गदर्शनाची कमतरता असतानादेखील आपल्या निकालांमधून ते आश्चर्यचकित करण्यात कधीही अपयशी ठरत नाहीत. चाइल्ड राईट्स ट्रस्टचे अध्यक्ष नागसिंह जी राव म्हणतात, अशी अनेक प्रकारची छुपी कारणे आहेत जी मुलींना त्यांच्या बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यास किंवा यशस्वी होण्यास भाग पाडतात.

“आम्ही बालविवाहाच्या सुमारे ३००० पीडितांसोबत काम केले आहे. प्रत्येक कथा वेगळी असली तरी या मुलींना जबरदस्तीने विवाह करण्यास भाग पाडले जाते यामागचे कारण म्हणजे त्यांचे शिक्षण. पालकांना मुलगी दहावी उत्तीर्ण व्हावी अशी इच्छा असते जेणेकरून वधूला ‘सुशिक्षित’ वर मिळेल आणि कमी हुंडा द्यावा लागेल. मुलीला तिच्या कुटुंबीयांकडून दहावी उत्तीर्ण झाली तर तिला पुढील शिक्षणाची परवानगी दिली जाईल असे सांगून फसवले जाते. गरिबीतून बाहेर पडण्यासाठी, घरच्या कामांपासून सुटका मिळावी यासाठी आणि चांगल्या आयुष्यासाठी मुली सर्वतोपरी प्रयत्न करुन परीक्षेची तयारी करतात आणि ते सर्व प्रयत्न त्याच्या पालकांना हुंडा सूट मिळण्यास मदत करतात. कर्नाटकच्या उत्तर भागातील बहुतेक गावांमध्ये हे घडते”, असे नागसिंहजी राव म्हणतात.

इतर भागांमध्ये, मुली बोर्डाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्यांची लग्न होण्याची भीती असते. जर मुलीने चांगले गुण मिळवले तर तिला पुढील अभ्यास करण्याची संधी मिळेल आणि कदाचित लग्न होण्याआधी नोकरीही मिळवेल. जर ती अपयशी ठरली तर लग्न करण्याचा एकमेव पर्याय असतो असेही नागसिंहजींनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why are girls ahead in board exam results explain by a psychiatrist abn