एपी, हिरोशिमा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रशियाशी सुरू असलेल्या संघर्षांत युक्रेनला पाठिंबा देणाऱ्या मोठय़ा देशांच्या नेत्यांशी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रविवारी संवाद साधला. रशियाने रणांगणात प्रतीकात्मक विजय मिळवल्याचा दावा केला असताना, आपल्या देशाच्या युद्ध जिंकण्याच्या प्रयत्नांना झेलेन्स्की यांनी गती दिली.

जी७ परिषदेच्या शेवटच्या दिवशी युक्रेनच्या अध्यक्षांनी लावलेल्या वैयक्तिक हजेरीतून, या गटाच्या परिषदेत युद्ध हा विषय केंद्रस्थानी आल्याचे अधोरेखित झाले.झेलेन्स्की यांनी रविवारी बैठकीच्या दोन मोठय़ा फेऱ्यांमध्ये भाग घेतला. यापैकी एक जी७ नेत्यांसोबत, तर दुसरी या नेत्यांसोबतच भारत, दक्षिण कोरिया व ब्राझील या आमंत्रित पाहुण्यांसोबत होती. त्यांनी अनेक नेत्यांसोबत समोरासमोर बोलणीही केली.

अमेरिकेकडून नवी मदत

झेलेन्स्की यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनसाठी ३७५ दशलक्ष अमेरिकी डॉलरच्या नव्या लष्करी मदत पॅकेजची घोषणा केली. अमेरिका युक्रेनला दारूगोळा आणि चिलखती वाहने पुरवेल असे त्यांनी सांगितले. यापूर्वी युक्रेनच्या वैमानिकांना अमेरिकी बनावटीच्या एफ-१९ लढाऊ विमानांवर प्रशिक्षण देण्याचे अमेरिकेने मान्य केले आहे. या मदतीसाठी झेलेन्स्की यांनी बायडेन यांचे आभार मानले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zelensky communication with the leaders of pro ukraine countries amy