Countries Without Indian : भारतातील अनेक नागरिक वेगवेगळ्या देशांमध्ये राहतात. त्यामुळे तुम्ही जगात कुठेही जाल, तिथे तुम्हाला एक तरी भारतीय नागरिक नक्कीच भेटेल. ब्रिटन, कॅनडा, युरोप, आफ्रिका आणि आशियाई देशांपर्यंत सर्व देशांमध्ये भारतीय लोक कामनिमित्त राहतात. मात्र, जगात असे काही देश आहेत, जिथे एकही भारतीय रहात नाही, पण असे का? हे कोणते देश आहेत? आपण जाणून घेऊयात…
जगातील ‘या’ देशांमध्ये एकही भारतीय राहत नाही
भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. जगातील बहुतेक १९५ देशांमध्ये भारतीय राहतात. पण, असे काही देश आहेत जिथे एकही भारतीय स्थायिक झालेला नाही. आपण अशा एकूण पाच देशांबद्दल जाणून घेऊ, जिथे एकही भारतीय नागरिक रहात नाही. पण, असे का? हे देश कोणते जाणून घेऊ…
१) व्हॅटिकन सिटी
युरोप खंडात वसलेला व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे. व्हॅटिकन सिटी या देशाचे क्षेत्रफळ ४४ हेक्टर म्हणजे सुमारे १०८ एकर परिसरात पसरले आहे. रोमन कॅथलिक धर्माचे पालन करणारे लोक येथे राहतात. या देशाची लोकसंख्या खूपच कमी आहे; पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे भारतीय नागरिक रहात नाहीत.
२) सॅन मारिनो
युरोपमधील आणखी एक देश म्हणजे सॅन मारिनो. हा देश युरोपातील सर्वात जुना प्रजासत्ताक देश आहे. त्याची लोकसंख्या तीन लाख ३५ हजार ६२० आहे. हा जगातील सर्वात लहान देशांपैकी एक आहे. या देशात एकही भारतीय रहात नाही, ही वेगळी बाब आहे. इथे तुम्हाला फक्त पर्यटनासाठी आलेलेच भारतीय लोक दिसतील.
३) बल्गेरिया
बल्गेरिया हा दक्षिण पूर्व युरोपमध्ये स्थित देश आहे. २०१९ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६९,५१,४८२ आहे. येथे राहणारे बहुतांश लोक ख्रिस्ती धर्माचे पालन करतात. भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांशिवाय या देशात एकही भारतीय रहात नाही.
४) तुवालू (एलिस बेटे)
तुवालूला जगात एलिस बेटे म्हणतात. हा देश ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येला पॅसिफिक महासागरात २६ चौरस किलोमीटरवर वसलेला आहे. या देशात सुमारे १२ हजार लोक राहतात. बेटावर जाण्यासाठी फक्त आठ किमीचा रस्ता आहे. १९७८ मध्ये स्वतंत्र झालेल्या या देशात एकही भारतीय स्थायिक झाला नाही.
५) पाकिस्तान
आपला शेजारी देश पाकिस्तानातही एकही भारतीय रहात नाही. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणि आर्थिक आणि राजकीय परिस्थितीमुळे येथे कोणताही भारतीय स्थायिक होत नाही. राजनयिक अधिकारी आणि कैदी यांच्याशिवाय एकही भारतीय येथे रहात नाही.
© IE Online Media Services (P) Ltd