LTE and VoLTE on mobile screen: स्मार्टफोन ही हल्ली काळाची गरज झाली आहे. अगदी एका कुटुंबात ५ सदस्य असतील तर एका घरी तुम्हाला ५ मोबाईल फोन दिसून येतील. सध्याच्या काळात मोबाईल शिवाय कुणीच राहू शकत नाही. स्मार्टफोनच्या माध्यमातून आपण अनेक कामं घरबसल्या करू शकतो. शॉपिंग करायची असो किंवा एखाद्या व्यक्तीशी संवाद साधायचा असो, यासाठी स्मार्टफोनचा वापर आवर्जून करतातच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजकाल प्रत्येकजण ऑनलाइन गेम्स, ऑडिओ, व्हिडिओ, शॉपिंग आणि ऑनलाइन शिक्षणाद्वारे आपल्या स्मार्टफोनमध्ये अधिक व्यस्त झाला आहे. परंतु या सर्व गोष्टींच्या वापरासाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी म्हणजेच मोबाईलवर डेटा असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल स्क्रीनवर LTE किंवा VoLTE लिहिलेले देखील पाहिले असेल. पण तुम्हाला त्याचा अर्थ आणि त्यातील फरक माहित आहे का? चला तर मग आज आपण याच प्रश्नाचे उत्तर समजून घेऊया…

(हे ही वाचा : तुमच्या स्मार्टफोनच्या खाली लहानसं छिद्र कशासाठी असतं माहितीये का? काम वाचून व्हाल अवाक्…)

मोबाईलमध्ये LTE किंवा VoLTE का दिसतं?

मोबाईल आपण दररोजच पाहतो. पण अचानक आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर LTE किंवा VoLTE असं लिहिलेलं दिसतं. असं का दिसतं, आणि या दोघांमध्ये काय फरक आहे, तुम्हाला माहिती आहे का, LTE चा फुलफॉर्म Long Term Evolution असा आहे. तर VoLTE चा फुलफॉर्म Voice over Long Term Evolution असा आहे. खरंतर, यांमध्ये लक्षणीय फरक आहे. तुम्ही दोन्हीमध्ये इंटरनेटचा आनंद घेऊ शकता परंतु त्यांच्यामध्ये फरक आहे ज्यामुळे मोबाईल वापरण्याची पद्धत बदलते.

वास्तविक, जेव्हा तुमच्या मोबाईलच्या नेटवर्क इंडिकेटरजवळ LTE लिहिलेलं असतं तेव्हा तुमच्या फोनवर कॉल येताच, इंटरनेट काम करणे बंद करेल. म्हणजेच फोन काॅल आल्यास मोबाईलचं इंटरनेट डिस्कनेक्ट होतं. तर याउलट जेव्हा स्क्रीनवर VoLTE लिहिलेलं असतं, तेव्हा तुम्ही कॉल दरम्यानही इंटरनेट वापरू शकता. यामुळे इंटरनेटच्या स्पीडमध्ये काही फरक पडत नाही.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know what is the difference between lte and volte heres information pdb