‘व्हेज’ आणि ‘नॉनव्हेज’ दोन्ही खाणाऱ्यांना काय म्हणतात माहीत आहे का ? व्हेज-नॉनव्हेज शब्द आले कुठून ?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणत्याही व्यक्तीला आपण सहजपणे विचारतो की, ती व्हेजिटेरियन आहे की, नॉनव्हेजिटेरियन? परंतु, नॉनव्हेजिटेरियन व्यक्ती शाकाहारी पदार्थ खातच असते. मग, अशा वेळी व्हेज आणि नॉनव्हेज खाणाऱ्या व्यक्तींना काय म्हणतात आणि मुळात व्हेजिटेरियन आणि नॉनव्हेजिटेरियन हे शब्द आले कुठून हे जाणून घेणे रंजक ठरेल.

साधारणपणे आहाराच्या मुख्य दोन प्रकारांवरून व्यक्तींमध्ये गट पडले आहेत. व्हेजिटेरियन म्हणजे शाकाहारी आणि नॉनव्हेजिटेरियन म्हणजे मांसाहारी. आता अंड ‘व्हेजिटेरियन’ प्रकारात आल्यावर शाकाहारी लोकांनी ‘एगेटेरियन’ हा नवा प्रकार निर्माण केला आहे. तसेच ‘व्हेगन’ म्हणजे अतिशुद्ध शाकाहारी, जे प्राण्यापासून निर्माण झालेले कोणतेही पदार्थ खात नाहीत. ‘व्हेजिटेरियन’ प्रकारातील लोक मांसाहार करत नाहीत. परंतु, ‘नॉनव्हेजिटेरियन’ प्रकारातील लोक शाकाहारी पदार्थ खात असतात. शाकाहारी लोकही काही वेळा मांसाहार करत असतात म्हणजेच ते मिश्राहार करत असतात. अशा मिश्राहारी लोकांना ‘फ्लेक्झेटेरियन’ असे म्हणतात.

हेही वाचा : विश्लेषण : पर्यावरणाचे रक्षक : सागरी कासव !

फ्लेक्झेटेरियन म्हणजे काय ?

‘फ्लेक्झेटेरियन’लाच ‘सेमी व्हेजिटेरियन डाएट’ असेही म्हणतात. ‘फ्लेक्सिबल’ या शब्दापासून ‘फ्लेक्झेटेरियन’ शब्द निर्माण झाला आहे. जे खाण्याच्या बाबतीत लवचीक आहेत, म्हणजे शाकाहार आणि मांसाहार करतात, त्यांना फ्लेक्झेटेरियन’ म्हणतात. ‘डच एव्हायर्नमेंटल ऑर्गनायझेशन’च्या मते, फ्लेक्झेटेरियन हे मटण खात नाहीत. ते मासे आणि अंडी खातात. परंतु, ‘नो मीट’ असे त्यांच्या फ्लेक्झेटेरियनच्या व्याख्येत दिलेले असते. तसेच ‘डच रिसर्च एजन्सी’च्या मते, आठवड्यातून एकदा किंवा एक-दोन आठवड्यांतून एकदा मांसाहार करणाऱ्या व्यक्ती या ‘फ्लेक्झेटेरियन’ प्रकारामध्ये येतात. एक दिवसाआड मांसाहार करणारी व्यक्तीही ‘नॉनव्हेजिटेरियन’ प्रकारामध्ये येते.

हेही वाचा : विश्लेषण : भारतातील चलनबंदीची गाथा…

‘पिक्सेटेरियन’ म्हणजे काय ?

‘पिक्सेटेरियन’ प्रकारातील लोक शाकाहारी असतात परंतु, शाकाहारासोबत केवळ समुद्री अन्न (सीफूड) खातात. पोषणमूल्य मिळण्यासाठी ते सीफूड खातात. परंतु हे फ्लेक्झेटेरियन प्रकारामध्ये येत नाहीत. कारण, फ्लेक्झेटेरियन काही दिवसांच्या फरकांनी पूर्ण मांसाहार करतात.

हेही वाचा : विश्लेषण : रविवारनंतर सोमवारच का येतो ? आठवड्याची रचना कोणी केली ?

‘एगेटेरियन’ म्हणजे काय ?

शाकाहारी लोक अंड हे प्राणिज मानतात. परंतु, काहींना आरोग्याच्या कारणानिमित्त अंड खावे लागते. पण, अन्य कोणतेही मांसाहारी पदार्थ ते खात नाहीत. त्यांना ‘एगेरीयन’ असे म्हणतात.

हेही वाचा : विश्लेषण : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या शुद्धीकरणावरून शाब्दिक चकमक; ही ‘शुद्धता’ नेमकी आली कुठून ?

व्हेजिटेरियन आणि नॉनव्हेजिटेरियन शब्दांची निर्मिती

इंग्रजीमध्ये व्हेजिटेरियन आणि नॉनव्हेजिटेरियन शब्दांची निर्मिती होण्याआधी शाकाहार आणि मांसाहार हे शब्द होतेच. तसेच भारतीय तत्त्वज्ञानामध्ये खासकरून बौद्ध आणि जैन तत्त्वज्ञानामध्ये अहिंसा हे महत्त्वपूर्ण तत्त्व मानले गेले. अहिंसेमधून शाकाहाराचा जन्म झाला. इंग्रजीमध्ये असणाऱ्या व्हेजिटेरियन या शब्दाचा वापर १८४५ च्या दरम्यान झालेला दिसतो. केवळ भाजीपाला आणि प्राण्याचा कोणताही भाग नसणारे अन्न याकरिता ‘व्हेजिटेरियन’ शब्दाचा प्रयोग करण्यात आला. ऑक्सफर्ड शब्दकोशाच्या मते, व्हेजी(भाजीपाला) आणि ‘एरियन’ हा प्रत्यय लावून संयुक्त शब्द ‘व्हेजिटेरियन’ तयार झाला. १८४७ मध्ये मँचेस्टरमध्ये व्हेजिटेरियन सोसायटीच्या स्थापनेनंतर हा शब्द लोकप्रिय झाला. ‘नॉनव्हेजिटेरियन’ म्हणजे जे ‘शाक(भाजीपाला) आहार’ करत नाहीत ते.

लोकांच्या खाण्याच्या पद्धतीनुसार वेगवेगळ्या ‘टर्म’ निर्माण झाल्याचे दिसून येते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know what those who eat both veg and non veg are called whats a origin of the word veg non veg vvk