UPI Errors, Sent Money To Wrong Mobile Number: युपीआय पेमेंट हे एकाअर्थी वरदान आहे, अगदी कुठेही कॅशलेस प्रवास करण्याची मुभा ही डिजिटल पेमेंट प्रणाली देऊ करते. पण कोणतीही गोष्ट म्हटली की फायदा व तोटे अशा दोन्ही बाजू बघणे गरजेचे आहे. अर्थात युपीआयमुळे वाढते खर्च, मोबाईलवरील वाढलेलं अवलंबित्व हे सगळे त्रास तर समोर आहेतच पण त्याहीपेक्षा डोक्याला ताप ठरणारा एक प्रकार म्हणजे चुकून दुसऱ्याच नंबरवर किंवा अकाउंटला पैसे पाठवणे. अलीकडे खरंतर सगळीकडे क्युआर कोड स्कॅन करून पेमेंट करता येते पण जेव्हा तुम्हाला एखाद्या मोबाईल नंबरला पेमेंट करायचं असतं तेव्हा चूक होण्याची शक्यता टाळता येत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण खबरदारी बाळगताना नंबर तपासूनच घेतो पण काहीवेळा एखाद्या व्यक्तीचा मोबाईल नंबर बदललेला असतो आणि इतर कुणाच्या अकाउंटशी लिंक झालेला असतो. तुम्ही याआधी याच नंबरवर व्यवहार केला असल्यास तुम्ही यावर पुन्हा पैसे पाठवत, पण यावेळेस ज्याचा मूळ क्रमांक होता त्याऐवजी ज्याच्या अकाउंटशी नंबर लिंक झालेला असतो त्याला पैसे जातात. आता अशा परिस्थितीत आपले पैसे कसे परत मिळवायचे हे आपण आज पाहणार आहोत.

चुकीच्या फोन नंबरला UPI ने पैसे पाठवल्यास परत कसे मिळतील?

सर्वात आधी अनपेक्षित व्यक्तीकडे हस्तांतरित केलेले पैसे परत मिळविण्यासाठी, तुम्हाला हे सिद्ध करावे लागेल की पैसे अनावधानाने ट्रान्सफर झाले आहेत. हे एकदा का सिद्ध झाले की पुढील जबाबदारी बँकेची असते. इकॉनॉमिक लॉ प्रॅक्टिस या संस्थेचे भागीदार, अभय चट्टोपाध्याय, यांच्या हवाल्याने टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, “चुकीच्या प्राप्तकर्त्याकडे पैसे ट्रान्स्फर झाल्यास, व्यवहार चुकीच्या पद्धतीने/अनावधानाने झाल्याचा पुरेसा पुरावा प्रभावित वापरकर्त्याने बँकेसमोर सादर करणे आवश्यक आहे.”

चट्टोपाध्याय यांनी असेही नमूद केले की रिझर्व्ह बँकेच्या डिजिटल व्यवहारांसाठी लोकपाल योजना २०१९ च्या नियमन ८ नुसार जर एखादी बँक आपले कर्तव्य पार पाडण्यात अपयशी झाली तर चुकीच्या प्राप्तकर्त्याला हस्तांतरित केलेले पैसे न दिल्याने बँकेविरुद्ध तक्रार दाखल करता येऊ शकते.

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेतील सीओओ श्रीजीथ मेनन यांनी टाइम्सला सांगितले की, तुम्ही जितक्या लवकर बँकेकडे किंवा बँकेच्या विरुद्ध तक्रार दाखल कराल तितकी पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त असते. लगेच तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधायला हवा, तुमच्या व्यवहाराचे तपशील आणि संबंधित बँक अकाउंट नंबर शेअर करावे लागतील. यावेळी ज्या व्यक्तीस चुकून पैसे गेले आहेत त्यांच्यासह प्राथमिक संपर्क करण्याचा प्रयत्न केला जाईल. बँकेला सुद्धा तुमचे पैसे पुन्हा प्राप्त व्हावे यासाठी मध्यस्थी करता येईल पण या विनंतीला समोरील व्यक्ती अमान्य सुद्धा करू शकते.
करंजावाला अँड कंपनीच्या भागीदार मनमीत कौर यांनी सांगितले की, आपल्या पूर्वीच्या मोबाईल नंबरच्या गोपनीयतेची खात्री करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

चर्चेतून पैसे परत मिळत नसल्यास तक्रार कशी कराल?

युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) वापरून केवळ चुकीचा व्यवहार झाला असेल, तर एखादी व्यक्ती तक्रार नोंदवण्यासाठी NPCI च्या विवाद निवारण यंत्रणेची मदत घेऊ शकते.

स्टेप 1: https://www.npci.org.in/what-we-do/upi/dispute-redressal-mechanism इथे भेट द्या.

स्टेप 2: ‘Complaint’ नावाच्या बॉक्सवर जा. येथे ड्रॉप-डाउन मेनूमधून व्यवहाराचे स्वरूप निवडा. त्यानंतर समस्या निवडा. उदाहरणार्थ, तुम्ही चुकीच्या व्यक्तीला अनावधानाने पैसे हस्तांतरित केल्यामुळे, व्यवहाराचे स्वरूप ‘Person to Person’ आणि समस्या ‘Incorrectly transferred to another account’ असे निवडा.

सुरुवातीला, व्यक्तीने UPI ॲपवर तक्रार करावी. जर एखाद्या व्यक्तीच्या तक्रारीचे उत्तर मिळाले नाही तर पुढील टप्प्यावर बॅक एंड (PSP) आणि NPCI (तक्रार पोर्टलचा वापर करून) व्यवहार हाताळणाऱ्या बँकेकडे तक्रार दाखल करता येईल.

हे ही वाचा<< भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी गोळ्या झाडलेली बंदूक होती परवाना प्राप्त! ‘हा’ बंदुकीचा परवाना मिळतो कसा?

एखाद्या व्यक्तीकडे तुमचा मोबाईल नंबर असल्यास त्याला/तिला तुमच्या बँक खात्याची माहिती मिळते का?

मोबाईल नंबर पुन्हा नियुक्त केल्याने ग्राहकाच्या बँक खात्यात स्वयंचलितपणे प्रवेश मिळत नाही. “बँका सामान्यत: ग्राहकांच्या बँक खात्यांचे संरक्षण करण्यासाठी अनेक टप्यांचा सुरक्षा प्रोटोकॉल वापरतात. तुमच्या बँक खात्यात प्रवेश करणे सुरक्षित व्हेरिफिकेशन प्रक्रियेद्वारे शक्य असते की, (जसे की पासवर्ड, पिन, सुरक्षा प्रश्न आणि टू-फॅक्टर व्हेरिफिकेशन इत्यादी). संबंधित मोबाइल नंबर निष्क्रिय करून पुन्हा नियुक्त केला असला तरीही, फक्त अधिकृत व्यक्तीच त्याच्या/तिच्या बँक खात्याला वापरू शकते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If i sent money to wrong phone number via upi google pay paytm how do i get my money back self money transfer mistakes to avoid svs
First published on: 13-02-2024 at 17:41 IST