Reason Behind Black Helmet : जेव्हढे लोकं दुचाकी चालवतात त्या सर्वांना माहित आहे की, हेल्मेट त्यांच्यासाठी किती महत्वाची गोष्ट आहे. हेल्मेट लावून दुचाकी चालवल्याने तुमच्यावर ट्रॅफिक पोलीस दंडात्मक कारवाई करत नाहीत. याचसोबत तुम्ही अनेक प्रकारच्या गंभीर अपघातांपासून वाचू शकता. जेव्हा तु्म्ही हेल्मेट घालून दुचाकी चालवता त्यावेळी तुमच्यासोबत कोणताही अपघाताचा प्रसंग येतो, त्यावेळी हेल्मेट तुमच्या डोक्याचं संरक्षण करतं. अनेक रिपोर्ट्सच्या माध्यमातून खुलासा करण्यात आलंय की, अपघातादरम्यान डोक्याला दुखापत झाल्याने अनेक लोकांचा जीव जातो. आज आम्ही तुम्हाला हेल्मेटच्या उपयोगाबद्दल नाही, तर त्याच्या काळ्या रंगाबद्दल माहिती देणार आहोत. अनेक दुचाकींच्या हेल्मेटचा रंग काळा का असतो? यामागे नेमकं कारण काय आहे? याबद्दल जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

दुचाकीच्या हेल्मेटचा रंग काळा का असतो?

दुचाकीच्या हेल्मेटच्या काळ्या रंगामागे विज्ञानापेक्षा जास्त प्रोडक्ट बनवणाऱ्या कंपनींचा नफा जोडला आहे. हेल्मेट बनवणाऱ्या कंपनी हेल्मेट बनवण्यासाठी ज्या प्लास्टिक आणि फायबर ग्लासचा वापर करतात, त्यांचा रंग काळाच असतो. त्यानंतर याच्या प्रोसेसदरम्यान अनेक प्रकारचं मटेरियल मिक्स केलं जातं. त्यानंतर या पूर्ण मिश्रणाचा रंग पिगमेंट ब्लॅक असतो. कंपनी त्यांच्या पैसा वाचवण्यासाठी याच पेगमेंटसोबत हेल्मेटचा निर्माण करते.

नक्की वाचा – माकडाने कहरच केला! फोटोशूट दरम्यान तरुणीला थेट दिलं चुंबन, व्हायरल Video ने अनेकांच्या उडवल्या झोपा

तर दुसरीकडे काही लोकांचा तर्क असा आहे की, कंपनी हे सर्व फॅशनसाठी करत असते. खरतर काळा रंग प्रत्येक प्रकारच्या कपड्यांना आणि दुचाकीच्या कलरचा मॅच करतो. त्यामुळे कंपनी काळ्या रंगाचं हेल्मेट बनवत असते. याशिवाय जास्तीत जास्त माणसांच्या केसांचा रंग काळा असतो. त्यामुळे जेव्हा ते काळ्या रंगाचा हेल्मेट घालतात, तेव्हा त्यांच्या डोक्यावर असलेलं हल्मेट वेगळं दिसत नाही. आता अनेक दुचाकीच्या कंपनी त्यांच्या बाईकच्या रंगाला मॅच असलेला हेल्मेट बनवतात.

हेल्मेट न घातल्याने किती जणांचे प्राण जातात?

रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाच्या २०२१ च्या रिपोर्टनुसार, रस्ते अपघातात होणाऱ्या एकूण मृतांमध्ये ४६,५९३ लोकांचा मृत्यू हेल्मेट न घातल्यामुळे झाला. तर यावर्षी एकूण ४,१२,४३२ रस्ते अपघात झाले होते. २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये रस्ते अपघातांच्या संख्येत एकूण १२.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, या अपघातांमध्ये लोकांच्या मृत्यू होण्याच संख्येत १६.९ टक्के वाढ झाली आहे.