नवीन वर्ष उजाडले की वाहनप्रेमींचे लक्ष ख-या अर्थाने लागून राहते ते दिल्लीत दरवर्षी भरणा-या ऑटो एक्स्पोकडे. सालाबादप्रमाणे यंदाही हा एक्स्पो पुढील आठवड्यापासून सुरू होत आहे. मात्र, यंदा त्याचे नेहमीचे प्रगती मदान हे ठिकाण बदलून प्रथमच ऑटो एक्स्पो दिल्लीबाहेर, नोईडात भरत आहे. जगभरातील नावाजलेले ब्रँड या एक्स्पोमध्ये सहभागी होत असतात, हे वाहनप्रेमींना सांगणे न लगे. मात्र, तरीही यंदाचे मुख्य आकर्षण असेल ते क्रायस्लरचे. प्रथमच क्रायस्लर भारतात येत आहे. असो. या ऑटो एक्स्पोच्या अनुषंगाने अनेक घडामोडी घडत आहेत. हा एक्स्पो ज्यांना ‘याचि देहा याचि डोळा’ पाहण्याची संधी मिळणार नाहीए त्यांच्यासाठी अनेकानेक वाहननिर्मात्या कंपन्यांनी थेट प्रक्षेपणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. अधिकाधिक टेक्नोसॅव्ही असलेल्या या एक्स्पोसाठी खास मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्सही विकसित करण्यात आले आहेत.
अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी ऑटो एक्स्पो अ‍ॅप फॉर अँड्रॉइड यूजर्स हे एॅप्लिकेशन विकसित करण्यात आले असून अँड्रॉइडधारक ते http://appworld. blackberry.com/webstore/content/45844887/lang=en&countrycode=IN येथून डाऊनलोड करून घेऊ शकणार आहेत.
ब्लॅकबेरीधारकांसाठीही  अशाच एॅप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली असून ते http://appworld. blackberry.com/webstore/content/45844887/lang=en&countrycode=IN येथून डाऊनलोड करून घेऊ शकणार आहेत.
याबरोबरच अ‍ॅप्लिकेशनचे वापरकत्रे गुगल प्ले स्टोअर ब्राऊज करून ऑटो एक्स्पो २०१४ च्या खास घडामोडी जाणून घेऊ शकणार आहेत. पुढील आठवड्यात एॅपल स्टोअर आणि िवडोज प्लॅटफॉर्मवर या सर्व सेवा उपलब्ध असतील.