तुम्ही फक्त एवढंच करायचं..
तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून दर गुरुवारी ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..! शब्दमर्यादा : २०० शब्द. ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com
बाइकवरून युरोप टूर
मला लहानपणापासूनच सायकिलग, ट्रेकिंगची आवड होती. शाळेत असताना घरी कोणालाही न सांगता मी सायकलवरून दूरदूरच्या ठिकाणी फिरून यायचो. सांगली आणि कोल्हापूर तर माझ्यासाठी घर-अंगणासारखे झाले होते. सायकलवरून या मार्गावर कितीतरी चकरा मारल्या असतील. गड-किल्ल्यांचीही भ्रमंती करून आलो. महाविद्यालयीन आयुष्यात मला ५० आणि ८० सीसीच्या मोपेड चालवायची संधी मिळाली. त्यानंतर जावा आणि बुलेटही हाती आल्या. मग माझी भ्रमंतीची रेंजही हळूहळू वाढू लागली. पदवीनंतर मी
एका बाजूला खळाळती नदी, मध्ये रस्ता आणि बाजूला उंच उंच डोंगर असे ते भारावून टाकणारे वातावरण होते. डॅन्यूब नदीवरची ती रम्य संध्याकाळ, आल्प्स पर्वतराजींमधील ती नयनरम्य दृष्ये सर्व सर्व मी डोळ्यांत आणि कॅमेरात साठवत होतो. आल्प्स पर्वतांतील १७ किमीचा बोगदा तर अविस्मरणीयच. जीनिव्हा, झुरिच ही तलावांची शहरे तर अप्रतिमच. रोमन आणि ग्रीक शहरे तर त्यांच्या इतिहासाची साक्ष देतात. व्हॅटिकन सिटीतही एक दिवस मुक्काम केला. व्हेनिसमध्ये बोटीतून फिरलो. एकूणच १०० दिवसांचा प्रवास इतक्या लवकर संपला की कल्पनाही केली नव्हती.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jan 2014 रोजी प्रकाशित
मी बाइकवेडा..
तुम्ही फक्त एवढंच करायचं..तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून दर गुरुवारी 'ड्राइव्ह इट' पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. 'मी बाइकवेडा' या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा …
First published on: 30-01-2014 at 10:24 IST
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I fond of bike