AIIMS Server Hacked Hackers Demand 200 crores How Ransomware Can attack Your Laptop And Mobile Cyber Safety Tips | Loksatta

विश्लेषण: AIIMS चा सर्व्हर हॅक करून मागितली २०० कोटींची खंडणी, रॅन्समवेअर कुणावरही करू शकतो हल्ला! कसा कराल बचाव?

AIIMS Server Hacked: मनी कन्ट्रोलच्या माहितीनुसार, AIIMSचा सर्व्हर हॅक झाल्याने ३ ते ४ कोटी रुग्णांचा तपशील धोक्यात आला आहे.

विश्लेषण: AIIMS चा सर्व्हर हॅक करून मागितली २०० कोटींची खंडणी, रॅन्समवेअर कुणावरही करू शकतो हल्ला! कसा कराल बचाव?
रॅन्समवेअर कुणावरही करू शकतो हल्ला! कसा कराल बचाव? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

AIIMS Server Hacked: दिल्लीतील ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ म्हणजेच AIIMS चा सर्व्हर मागील सहा दिवसांपासून ठप्प झाला आहे. AIIMSचा सर्व्हर हॅकर्सने हॅक केल्याची माहिती ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली होती. हॅकर्सने AIIMS प्रशासनाकडे जवळपास २०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे समजत आहे. इतकेच नव्हे तर ही खंडणीची रक्कम क्रिप्टोकरन्सीच्या (आभासी चलन) स्वरुपात द्यावी, अशीही मागणी हॅकर्सनी केली आहे .

‘मनी कन्ट्रोलच्या माहितीनुसार, AIIMSचा सर्व्हर हॅक झाल्याने ३ ते ४ कोटी रुग्णांचा तपशील धोक्यात आला आहे. सध्या रुग्णालयातील आपत्कालीन रुग्ण, ओपीडी, प्रयोगशाळा आणि इतर कामकाज कॉम्प्युटरशिवाय केले जात आहे केलं जात आहे. एम्स रुग्णालयाचा सर्व्हर हॅक करण्यासाठी रॅनसमवेअर या सॉफ्टवेअरचा वापर केला जात होता. हा व्हायरस नेमका काय आहे आणि त्यापासून आपण कसे सुरक्षित राहू शकता हे जाणून घेऊयात…

रॅन्समवेअर म्हणजे काय?

रॅन्समवेअर हा एक प्रकारचा सॉफ्टवेअर आहे, ज्याचा वापर सायबर गुन्हेगारांद्वारे, हॅक केलेल्या सिस्टीममधील फाईल्स व माहिती चोरण्यासाठी केला जातो. ही माहिती ऑनलाईन लीक करण्याच्या किंवा गैरवापर करण्याच्या धमकीने खंडणीची मागणी केली जाते. AIIMS ची संगणक प्रणाली नेमक्या कशा प्रकारे हॅक झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, ईमेलद्वारे हे हॅकिंग झाल्याचे प्रथम अंदाज आहेत. इमेलद्वारे किंवा अन्य मार्गांनी पाठवलेल्या असुरक्षित वेब लिंकवर क्लिक केल्यावर वापरकर्त्याच्या नकळत व्हायरस असणारे सॉफ्टवेअर डाउनलोड होते व हा व्हायरस संपूर्ण नेटवर्कमध्ये पसरू शकतो.

CERT-In ने डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे

  • वापरकर्त्यांनी आपल्या संगणक व लॅपटॉपची ड्राइव्ह नियमित अपडेट केल्यास हा धोका कमी होऊ शकतो.
  • कोणत्याही असुरक्षित अन्य ऑनलाईन साईट्सना ब्लॉक करणे फायद्याचे ठरेल.
  • नियमितपणे ऑफलाइन डेटा बॅकअप ठेवा
  • सर्व खात्यांमध्ये विशेष खबरदारी बाळगून थोडा कठीण व वेगळे कॉम्बिनेशन असणारे पासवर्ड असणे आवश्यक आहे.
  • अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करा.
  • चुकूनही वापरकर्त्यांनी अनपेक्षित ई-मेलमध्ये जोडलेल्या URL लिंक उघडू नयेत. योग्य पडताळणी केल्याशिवाय असुरक्षित लिंकवर क्लिक करू नका.
  • तुमच्या संगणकात प्रवेशासाठी मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरु करा
  • सरकारी संस्था तसेच संवेदनशील माहिती बाळगणाऱ्या व्यक्तींनी विशेषतः या खबरदारीच्या उपाययोजनांची दखल घ्यायला हवी.

हे ही वाचा<< विश्लेषण: Apple Tax वरुन टेक जगतात दोन गट; एलॉन मस्क विरुद्ध Apple वादाच्या केंद्रस्थानी असलेला हा कर आहे तरी काय?

AIIMS प्रमाणेच यापूर्वी मे महिन्यात, स्पाइसजेटला अशा धोक्याचा सामना करावा लागला होता, ऑइल इंडियाला एप्रिल महिन्यात हॅकर्सनी टार्गेट केले होते. सायबर सिक्युरिटी फर्म ट्रेलिक्सने तिसर्‍या तिमाहीच्या जागतिक अहवालात २५ प्रमुख रॅन्समवेअरची माहिती दिली होती. ग्लोबल क्राईम ट्रेंडच्या अहवालानुसार, रॅन्समवेअरच्या धोक्यात येत्या काळात ७२% पर्यंत वाढ होण्याची अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 18:59 IST
Next Story
विश्लेषण: ‘इस्रो’मधील गुप्तहेर प्रकरण नेमकं काय आहे? वैज्ञानिक नंबी नारायणन यांचा या प्रकरणाशी काय संबंध होता?