China Hydropower Dam: चीनने जगातील सर्वांत मोठे धरण बांधण्यास सोमवारपासून सुरुवात केली आहे. चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी तिबेट पठाराच्या पूर्वेकडील काठावर जगातील सर्वांत मोठ्या जलविद्युत धरणाचे बांधकाम सुरू केल्याची घोषणा केली आहे. सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआच्या माहितीप्रमाणे, या धरणाचा खर्च किमान १७० अब्ज डॉलर्स (एक लाख ४४ हजार कोटी) एवढा असण्याचा अंदाज आहे.
यांग्त्झी नदीवरील थ्री गॉर्जेस धरणानंतर चीनचा सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला हा जलविद्युत प्रकल्प बांधण्यास सुरुवात झाली आहे. चिनी बाजारपेठा आर्थिक चालना देणारे म्हणून याकडे पाहत आहेत. परिणामी सोमवारी स्टॉक आणि बाँडच्या किमतीही वाढल्या.

चीनच्या अर्थव्यवस्थेवर जलविद्युत प्रकल्पाचा परिणाम

गेल्या वर्षी ब्रिटनने वापरलेल्या विजेच्या समतुल्य वार्षिक ३०० अब्ज किलोवॉट तास वीजनिर्मिती करण्याच्या क्षमतेचे पाच कॅस्केड जलविद्युत प्रकल्पांनी बनलेले हे धरण यारलुंग झांगबो नदीच्या खालच्या भागात असेल. नदीचा एक भाग ५० किलोमीटर लांबीच्या दोन हजार मीटर (६,५६१ फूट) खोलवर जातो. त्यामुळे जलविद्युत निर्मितीची प्रचंड क्षमता मिळते.

भारत आणि बांगलादेशने आधीच लाखो लोकांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तर स्वयंसेवी संस्थांनी पठारावरील सर्वांत श्रीमंत आणि वैविध्यपूर्ण वातावरणांपैकी एक असलेल्या धोक्याचा इशारा दिला आहे. बीजिंगने म्हटले आहे की, हे धरण तिबेट आणि उर्वरित चीनमधील विजेची मागणी पूर्ण करण्यास मदत करील. मात्र, त्याचा प्रवाही पाणीपुरवठा किंवा पर्यावरण यांवर मोठा परिणाम होणार नाही. २०३० च्या दशकात हे धरण कार्यरत होण्याची अपेक्षा आहे.
चीनचा सीएसआय इंडेक्स (कन्स्ट्रक्शन अँड इंजिनियरिंग इंडेक्स) चार टक्क्यांनी वाढून सात महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. पॉवर कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन ऑफ चायना आणि आर्कप्लस ग्रुप पीएलसी त्यांच्या दैनंदिन मर्यादा १० टक्क्यांपर्यंत वाढल्या.

गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून असे जलविद्युत प्रकल्प बाँड्ससारखे लाभांश देतात, असे शांघाय झुओझोऊ इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटचे भागीदार वांग झुओ म्हणाले. त्यांनी इशारा दिला की, संबंधित स्टॉकमध्ये सट्टेबाजीच्या खरेदीमुळे मूल्यांकन वाढेल. या प्रकल्पामुळे सिमेंट आणि इतर बांधकाम साहित्याची मागणी वाढेल, असे हुआताई सिक्युरिटीजने ग्राहकांसाठीच्या एका पत्रात म्हटले आहे.
बीजिंगमधील लिस्टेड हुनान वुक्सिन टनेल इंटेलिजंट इक्विपमेंट कंपनीचे शेअर्स ३० टक्क्यांनी वाढले. ही कंपनी बोगदा बांधकामातील उपकरणे विकते. जिउकांग टेक्नॉलॉजीज कंपनी लिमिटेडचे शेअर्स ३० टक्क्यांनी वाढले. ही कंपनी इंटेलिजंट मॉनिटरिंग टर्मिनल्स बनवते. सिमेंट उत्पादक झिझांग तियानूल कंपनी लिमिटेड व तिबेट गाओझेंग एक्सप्लोसिव्ह या दोन्ही कंपनींच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली.

व्यापक परिणाम

शिन्हुआ वृत्तसंस्थेने शनिवारी सांगितले की, चीनच्या पंतप्रधानांनी धरणाचे या शतकातील प्रकल्प असे वर्णन केले आणि पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी पर्यावरणीय संरक्षणावर विशेष भर दिला पाहिजे, असे म्हटले आहे. सोमवारी सरकारी रोखे उत्पन्न वाढले आणि ३० वर्षांचा सर्वाधिक व्यापार झालेला ट्रेझरी फ्युचर्स पाच आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आला. कारण- गुंतवणूकदारांनी या बातमीचा अर्थ चीनच्या आर्थिक चालनेचा भाग म्हणून लावला. नव्याने स्थापन झालेल्या सरकारी मालकीच्या चायना याजियांग ग्रुपच्या देखरेखीखाली असलेला हा प्रकल्प सार्वजनिक गुंतवणुकीत मोठी वाढ दर्शवतो. त्यामुळ आर्थिक विकासाला चालना मिळेल. या प्रकल्पाच्या बांधकामाला १० वर्षे लागतील, असे गृहीत धरले तरी गुंतवणुकीत दरवर्षी १२९ अब्ज युआन वाढ होऊ शकते, असे एका नोंदीत म्हटले आहे. प्रत्यक्षात या प्रकल्पाचे आर्थिक फायदे आणखी जास्त असू शकतात.

महत्त्वाचे मुद्दे:

  • चीन जलविद्युत निर्मितीत मोठी गुंतवणूक करत असल्याने, भविष्यात तो ऊर्जा निर्यातीसाठी सक्षम बनेल
  • भारतात (विशेषतः अरुणाचल प्रदेश, आसाम) येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी होऊ शकतो
  • भारतासाठी स्पर्धात्मक बाजारात अडचणी वाढू शकतात
  • नदीवरील नियंत्रण चीनला भारतावर रणनीतिक दबाव ठेवण्यासाठी वापरता येईल
  • सीमाविवादाच्या पार्श्वभूमीवर हे अधिक गंभीर ठरू शकते
  • भारताला संरक्षणात्मक उपाययोजना, जलमापन उपकरणे, पायाभूत सुविधा यावर अधिक खर्च करावा लागू शकतो
  • केंद्र आणि राज्य सरकारांच्या अर्थसंकल्पावर ताण

या प्रकल्पामुळे किती रोजगारनिर्मिती होऊ शकते?

माध्यमांच्या माहितीनुसार, जवळपास दोन दशके पूर्ण झालेल्या थ्री गॉर्जेस प्रकल्पामुळे सुमारे १० लाख नोकऱ्या निर्माण झाल्या. त्यामुळे काही प्रमाणात तितक्याच लोकांना विस्थापितही केले गेले. यारलुंग झांगबो प्रकल्पामुळे किती लोक विस्थापित होतील हे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेले नाही. यारलुंग झांगबो तिबेमध्ये उगम पावते आणि दक्षिणेकडे भारतात व शेवटी बांगलादेशात वाहत जाते. त्यानंतर ती पुढे ब्रह्मपुत्रा म्हणून वाहते. या धरणामुळे तिबेटी पठाराचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल आणि नदीच्या खालच्या भागात राहणाऱ्या लाखो लोकांवर परिणाम होईल, असे काही स्वयंसेवी संस्थांचे म्हणणे आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या वर्षाच्या सुरुवातीला म्हटले की, सीमेपासून फक्त ५० किमी अंतरावर असलेल्या इतक्या मोठ्या धरणामुळे भारतीय राज्यात वाहणाऱ्या नदीचा ८० टक्के भाग कोरडा पडू शकतो आणि अरुणाचल प्रदेश, तसेच शेजारच्या आसामच्या खालच्या भागात पूर येऊ शकतो. काही तज्ज्ञांनी भूकंपाच्या अनुषंगाने सक्रिय असलेल्या क्षेत्रात या प्रकल्पाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

भारत, बांगलादेशला चिंता

या जलविद्युत प्रकल्पात पाच कॅस्केड पॉवर स्टेशन्स असतील. त्यामुळे दरवर्षी ३०० अब्ज किलोवॉट तासांपेक्षा जास्त वीजनिर्मिती होईल. दरवर्षी ३० कोटी लोकांना वीज पुरवली जाईल. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. त्यावर बांधकाम सुरू झाले आहे.
चीनच्या या प्रकल्पामुळे भारत आणि बांगलादेशमध्ये चिंता निर्माण झाली आहे. ज्या ठिकाणी हे धरण बांधले जात आहे, त्या ठिकाणी अनेकदा भूकंप होतात. त्याशिवाय ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्यावर चीनचे नियंत्रण असेल. या धरणातून एकाच वेळी पाणी सोडले गेले, तर सीमावर्ती भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. सीमाभागाजवळ राहणाऱ्या आदिवासींचे जीवन आणि संसाधने उद्ध्वस्त होतील. कारण- भविष्यात चीन या धरणाचा वापर शस्त्र म्हणून करू शकतो