होळी सण आज देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. भारतीय संस्कृतीत या सणाला विशेष महत्त्व आहे. हा सण म्हणजे चांगल्यावर विजयाचे प्रतीक मानला जातो. संपूर्ण देश विविध रंगांमध्ये रंगतो. या दिवशी भांग पिण्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. भांग म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर येतो तो एक मादक पदार्थ. परंतु, प्रमाणात भांगेचे सेवन केल्यास त्याचे काही आरोग्यवर्धक फायदेही आहेत. त्यासह भात लागवड आणि कीटकनाशक म्हणूनही याचा वापर केला जात आहे. भांगेच्या गुणकारी फायद्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

भांग म्हणजे काय?

भारतात कॅनॅबिस इंडिका नावाचे झुडूप उगवते, त्यापासूनच भांग तयार केली जाते. सामान्यतः याला गांजाचे रोप, असेही म्हणतात. हे झुडूप ४ ते १० फूट उंच असू शकते. भारतात प्रामुख्याने हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार व पश्चिम बंगालमध्ये कॅनॅबिस आढळून येते. कॅनॅबिसला तेलुगूमध्ये गांजाई, तमीळमध्ये गांजा व कन्नडमध्ये बांगी, असे म्हणतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Different type of uses of cannabis bhang holi rac
First published on: 25-03-2024 at 15:32 IST