गेल्या काही दिवसांत तंत्रज्ञानानं मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. वाढत्या तंत्रज्ञानामुळे शरीराची हालचाल करण्याची आवश्यकता आणि इच्छासुद्धा कमी होत चालली आहे. जगभरातील लोकसंख्येपैकी अनेक जण दिवसभर बसून वेळ घालवतात. काही जण कामाच्या निमित्ताने संगणकासमोर खुर्चीवर बसून काम करतात, काही जण तासनतास टीव्ही बघण्यात वेळी खर्ची करतात. खरं तर मनुष्याचे शरीर हे हालचाल करण्यासाठी तयार केलेले असून, तासनतास एकाच ठिकाणी बसून राहणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील सॅन दिएगो (यूसीएसडी) यांच्या नव्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अभ्यासात ६३ ते ९९ वर्ष वयोगटातील एकूण ५८५६ महिलांनी सहभाग घेतला होता. जवळपास सात दिवस त्यांचे निरीक्षण केले गेले असून, त्यांच्या खुर्चीवरून बसण्या आणि उठण्याच्या हालचालींचाही अभ्यास केला गेला आहे. विशेष म्हणजे त्यातील १७३३ सहभागींचा मृत्यू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संशोधकांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून हालचाली टिपण्याचा अभ्यास केला. त्यानंतर त्याचा मृत्यूच्या धोक्याशी संबंध जोडण्यात आला आहे. अभ्यासात सहभागी झालेले आणि दिवसातून ११ तासांपेक्षा जास्त वेळ बसलेल्या व्यक्तींना मृत्यूचा धोका अधिक आहे. त्या तुलनेत दिवसातून साडेनऊ तासांपेक्षा एकाच जागी कमी बसलेल्या लोकांमध्ये तो ५७ टक्क्यांहून अधिक आहे. तसेच जास्त प्रमाणात जोरदार व्यायाम केल्यानंही मृत्यूचा धोका ओढावू शकतो. बराच वेळ एकाच जागी बसत असल्यास टाइप २ मधुमेह, हृदयविकार आणि शरीरात स्टोन तयार होण्यासारख्या आजारांचा धोका संभवू शकतो. त्यामुळे अशा वेळी व्यायाम केल्यानंही काही फायदा मिळत नाही, असंही २०१९ च्या अभ्यासात आढळून आले आहे. दररोज ९ हजार ते १० हजार ५०० पावलं चालल्याने अकाली मृत्यूचा धोका कमी होतो, असेही ऑस्ट्रेलियातील एका अभ्यासात आढळून आले आहे.

हेही वाचाः महाराष्ट्राच्या सख्ख्या शेजाऱ्यांनी घातली हुक्क्यावर बंदी, काय आहे प्रकरण?

कमी बसणे आरोग्यासाठी फायदेशीर

परंतु UCSD अभ्यासानुसार, सातत्याने बसल्यामुळे पार्श्वभागावर आणि पाठीच्या कण्यावरही परिणाम होत असल्याचं समजतंय. ऑस्ट्रेलियाच्या अभ्यासात मनगटावर घड्याळ बांधून या हालचाली टिपल्या आहेत. म्हणजेच जर एखादी व्यक्ती अर्धा तास उभी राहिली तर तरीही मनगटावर असलेल्या स्मार्ट घडाळ्यानुसार ती व्यक्ती बसलेली असल्याचं समजण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या अभ्यासातून वेगवेगळे निष्कर्ष निघू शकतात. परंतु UCSD आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून हे संशोधन केल्यानं ते जास्त खात्रीशीर असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. UCSD अभ्यासातील पुरावे अधिक चांगले असल्याचं पाहायला मिळत आहे. कमी बसणे आरोग्यासाठी फायदेशीर असून, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची सध्याची मार्गदर्शक तत्त्वे यास समर्थन देतात.

हेही वाचाः तामिळनाडू पोलिसांनी जेरबंद केले ‘ईडी’च्याच अधिकाऱ्याला! भाजपेतर राज्यात पोलिसांचा केंद्रीय यंत्रणांशी संघर्ष वाढतोय?

तुम्ही खूप वेळ बसताय का?

खरं तर किती बसणे म्हणजे प्रमाणाच्या बाहेर बसणे यासंदर्भातही UCSD ने सांगितले आहे. UCSD अभ्यासानुसार, दररोज ११ तास एकाच जागी बसून राहणे खूप धोकादायक आहे. इतर संशोधनानुसार दररोज फक्त सात तास एकाच ठिकाणी बसणे खूप धोकादायक असू शकते. बऱ्याच संशोधनानुसार, तुम्ही एकाच वेळी ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसू नये, असे सांगितले जाते, कारण यामुळे तुमची रक्तातील साखरेची पातळी आणि रक्तदाब वाढू शकतो. तुम्ही ऑफिस कर्मचारी असाल आणि जास्त वेळ बसण्याचे टाळायचे असल्यास बसलेल्या जागेवरच उठून उभे राहा किंवा तुम्ही उठून नोकरीच्या कामावरच्या ठिकाणी किंवा कॉलवर असताना इकडे-तिकडे फिरू शकता. घरी तुम्ही टीव्ही जाहिरातील ब्रेक दरम्यान उठून उभे राहू शकता किंवा चालू शकता. जर तुम्ही खूप वेळ बसले असाल तर काही स्मार्ट उपकरणेसुद्धा आपल्याला सूचना देतात, त्यासाठी उपकरणात तशी सेटिंग्ज करावी लागते. तसेच अपंगत्व आलेली व्यक्तीही हाताचे व्यायाम करून रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकते. जोपर्यंत तुम्ही जास्त चालत आहात तोपर्यंत तुम्हाला त्याचे चांगले फायदे मिळत राहतील. त्यामुळे तुम्ही सातत्याने चालणे कधीही सोडू नका.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you sit and work for 7 to 11 hours a day then read this vrd