मागील काही वर्षांपासून साहसी पर्यटनाकडे लोकांचा कल वाढतो आहे. अनेक जण डोंगर-दऱ्या चढणे, टेकडीवरून नदीत किंवा तलावात उडी मारणे, घनदाट जंगलात फिरणे, यासारख्या साहसी पर्यटनाकडे आकर्षित होताना दिसून येत आहेत. दरम्यान, साहसी पर्यटन प्रकारांमध्ये आता ‘व्होल्कॅनो टुरिझम’ म्हणजेच ‘ज्वालामुखी पर्यटन’ या नवीन प्रकाराचा समावेश झाला आहे. मात्र, उकळणारा तप्त लाव्हारस बघण्यासाठी केलं जाणारं ‘व्होल्कॅनो टुरिझम’ म्हणजे नेमकं काय? ते कशा प्रकारे केले जातं? आणि त्याची ठिकाणं नेमकी कोणती आहेत? सविस्तर जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – विश्लेषण: निवडणूक रोखे योजनेचे भवितव्य काय? सत्ताधाऱ्याविरुद्ध विरोधकांची तक्रार काय?

‘व्होल्कॅनो टुरिझम’ म्हणजे काय?

अनेकांना ज्वालामुखीच्या उद्रेकातून निघणारा तप्त लाव्हरस बघण्याची उत्सुकता असते. अशा वेळी बरेच जण हा लाव्हारस हेलिकॉप्टरमधून बघतात किंवा अगदी त्याच्या जवळ जाऊन फोटो काढतात. अशा लोकांना ‘लाव्हा चेजर्स’ असं म्हटलं जातं. अर्थात ज्वालामुखीच्या उद्रेकातून निघणारा लाव्हा कोणत्या प्रकारचा आहे, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.

हेही वाचा – विश्लेषण: सायबर फसवणुकीतील रक्कम कशी वाचवावी? ‘गोल्डन अवर’ का महत्त्वाचा?

या ठिकाणी केले जाते ‘व्होल्कॅनो टुरिझम’

‘व्होल्कॅनो टुरिझम’च्या यादीत पहिल्या नंबरवर जपानमधील माउंट फुजी हे शिखर आहे. ‘व्होल्कॅनो टुरिझम’साठी अनेकजण याठिकाणी भेट देतात. याठिकाणी ज्वालामुखीचा शेवटाच उद्रेक १९६० च्या दशकात झाला असला, तरी येथील लाव्हा आजही सक्रीय असल्याचे बोललं जाते. दरम्यान, हे ठिकाण आता जापान सरकारकडून पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथे शेकडो पर्यटक लाव्हा बघण्यासाठी भेट देतात.

‘व्होल्कॅनो टुरिझम’ आणखी एक ठिकाण म्हणजे इंडोनेशिया. येथील ज्वालामुखी सक्रिय आणि धोकादायक असल्याचे बोलले जातं. काही दिवसांपूर्वीच माऊना लोआ येथे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याचे बघायला मिळाले होते. यावेळी शेजारी असलेली गावंही खाली करण्यात आली होती. या ज्वालामुखीचे लोट अनेक दिवस आकाश दिसून आले होते.

याचबरोबर आईसलॅंड येथेही ‘व्होल्कॅनो टुरिझम’साठी लोकं भेट देतात. २०२१ मध्ये जेव्हा संपूर्ण जग करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत होते, तेव्हा हजारो लोकं या ठिकाणी मास्क आणि सुरक्षा उपकरणांसह लाव्ह्याचे फोटो काढत होते.

हेही वाच – विश्लेषण : प्लास्टिक निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय कशासाठी? यातून नेमके कोणते बदल होणार?

‘व्होल्कॅनो टुरिझम’ धोकादायक

‘व्होल्कॅनो टुरिझम’ हे अत्यंत धोकादायक आहे. लाव्हाच्या संपर्कात आल्याने अनेकांनी आपला जीव गमावला आहे. तसेच या ज्वालामुखीतून निघणाऱ्या विषारी वायूमुळे फुफ्फुसांचा संक्रमन होण्याची शक्यता आहे. एका रिपोर्टनुसार २०१० ते २०२२ दरम्यान, ज्वालामुखी बघण्यासाठी गेलेल्या १ लाख २५ हजार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. २०१९मध्येही न्यूझीलंडमध्ये व्हकारी येथे झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे २२ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. असे असतानाही ज्वालामुखी बघण्यासाठी गेलेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यासाठी अनेक मार्गदर्शक पुस्तकेही उपलब्ध आहेत. हे पर्यटन करताना नेमकी काय काळजी घ्यावी, याबाबतची सविस्तर माहिती या पुस्तकांमध्ये देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained what is volcano tourism know in details place and guidelines spb
First published on: 05-12-2022 at 12:48 IST